HOME   महत्वाच्या घडामोडी

हा तर ‘इलेक्शन’ संकल्प

अर्थसंकल्पावर आ.सतीश चव्हाण यांची प्रतिक्रिया

हा तर ‘इलेक्शन’ संकल्प

औरंगाबाद- केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून नुसताच घोषणांचा पाऊस पाडून जनतेला आपलेसे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प नसून ‘इलेक्शन’ संकल्प म्हणावा लागेल. बळीराजाचा विचार केला तर आता सरकार अल्प भूधारक शेतकर्‍यांना केवळ सहा हजार रूपयांचे वार्षीक अनुदान देणार आहे. म्हणजे महिन्याला ५०० रू., तर रोज १७ रू. मात्र सध्या शेतीवरील खर्च लक्षात घेतला तर हे अनुदान अगदीच तुटपुंजे आहे.
पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून मध्यमवर्गीयांना खुश करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र वाढती महागाई लक्षात घेतली तर ही किरकोळ मलमपट्टी ठरते. असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या समस्या खूप गंभीर आहेत. त्यासाठी कायदेशीर सुधारणा करून त्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. आता या कामगारांना सरकार निवृत्तीवेतन व ०३ हजार पेन्शन देणार आहे म्हणे. म्हणजे १०० रू रोज. पण ते कोणत्या आधारावर देणार हे सांगितलेले नाही. देशातील बेरोजगारीने मागील ४५ वर्षातील उच्चांक गाठला असून सरकारने मात्र त्यावर भाष्य केलेले नाही. वर्षाला ०२ कोटी रोजगार देवू म्हणत युवकांना नुसतेच ‘अच्छे दिन’चे गाजर दाखवण्याचे काम केले. त्यामुळे येणार्‍या निवडणूकीत देशातील शेतकरी, युवक आपला रोष मतदानातून दाखवून देतील यात तीळ मात्र ही शंका नाही.


Comments

Top