HOME   महत्वाच्या घडामोडी

आज सर्वपक्षीय बैठक, शहिदांवर आज अंत्यसंस्कार, शबाना-अख्तरांची पाक भेट रद्द, मुस्लिम बांधवांची रॅली, मसूदला चीनचा पाठिंबा, राणेंचा उमेदवार जाहीर, युती फायनल!......१६ फेब्रुवारी २०१९

आज सर्वपक्षीय बैठक, शहिदांवर आज अंत्यसंस्कार, शबाना-अख्तरांची पाक भेट रद्द, मुस्लिम बांधवांची रॅली, मसूदला चीनचा पाठिंबा, राणेंचा उमेदवार जाहीर, युती फायनल!......१६ फेब्रुवारी २०१९

* पुलवामा घटनेत शहीद झालेल्या बुलडाण्यातील दोन शहीद जवानांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
* नितीन राठोड आणि संजय राजपूत या दोन शहिदांचे पार्थिव आधी औरंगाबादेत पोचणार
* राठोड आणि राजपूत यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख देणार, कुटुंबियांचं पुनर्वसन करणार- मुख्यमंत्री
* दिल्ली विमानतळावर शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करुन नरेंद्र मोदींनी हात जोडून शवपेट्यांना घातली प्रदक्षिणा
* हल्ला करणार्‍यांना किंमत चुकवावी लागेल, पंतप्रधानांचा इशारा
* पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा- शिवसेना
* आम्ही आज केंद्र सरकारसोबत, त्याचे कसलेही राजकारण करणार नाही- राहूल गांधी
* पंतप्रधान आज महाराष्ट्रात दोन ठिकाणी सभा, विविध विकास कामांचे भूमिपूजन
* पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भारताने पाठविले समन्स
* पुलवामा हल्ल्याचा कट पाकिस्तानातून
* जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांनी पाकिस्तान भेट केली रद्द
* पाकिस्तानचा बदला घ्या, ठोकून काढा- शिवसेना
* पुलवामा हल्ला प्रकरणी सात संशयितांना अटक
* पुलवामा प्रकरणी आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक
* पुलवामा हल्ल्यासाठी ८० किलो आरडीएक्सचा वापर करण्यात आल्याची माहिती
* पाकिस्तानच्या निषेधार्थ शिर्डीत मुस्लीम समाजाने काढली रॅली, शहिदांना श्रद्धांजली
* जैश-ए-मोहम्मदचा कामरानने पुलवामा हल्ल्याचा कट रचला आणि आदिलने आत्मघाती हल्ला घडवून आणल्याचा संशय
* जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरला सहकार्य करणे सुरुच ठेवण्याचा चीनचा निर्णय
* अमेरिकेने पुलवामा हल्ल्याचा केला निषेध, पाकने दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणे तातडीने थांबवावे, दहशतवाद्यांना आसरा देऊ नये- अमेरिका
* पाकिस्तानला दिलेला 'सर्वाधिक पसंत देश'चा दर्जा घेण्यात आला मागे, पाकवर भारताचा आर्थिक-राजनैतिक दबाव
* महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा पहिला लोकसभा उमेदवार नारायण राणे यांनी केला जाहीर
* स्वाभिमानी पक्षातून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून निलेश राणे लढणार निवडणूक
* शिवसेना भाजपा युती निश्चित, विधान सभेसाठी ५०-५० तर लोकसभेसाठी सेना २३, भाजपा २५ जागा निश्चित
* राज्यातील विविध महामंडळांचे कामकाज पुन्हा सुरू, अण्णा भाऊ साठे महामंडळाला अधिक निधी- सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले
* साखर कारखाना विक्री घोटाळा : शरद पवारांवर अण्णांनी केलेल्या आरोपांची काय चौकशी केली?- उच्च न्यायालय
* कारखाना घोटाळ्यामुळे राज्य सरकारचा २५ हजार कोटींचा महसूल बुडवल्याचा अण्णा हजारे यांची २०१६ मध्ये होती जनहित याचिका
* पानसरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी कोल्हापूर येथे गीतकार जावेद अख्तर यांचे व्याख्यान
* आगामी काळात वंचित बहुजन आघाडी सत्ता स्थापन करणार- प्रकाश आंबेडकर
* वयोमानानुसार हत्यार पेलवणार नाही, पण गरज पडलीच तर जवानांना सामग्री पुरवण्याचं काम करीन- अण्णा हजारे
* पंढरपूर माघी यात्रेसाठी कर्नाटकमधून आलेल्या बसला मंगळवेढ्याजवळ अपघात, ४० वारकरी जखमी
* अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशिद परिसराजवळ भूसंपादनासाठीच्या याचिकेवर सुनावणी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
* पाणीटंचाई आणि प्रतिकूल हवामानामुळे देशातील कापसाच्या उत्पादनात घट, सर्वाधिक कापूस उत्पादन करण्याचा मान मिळणार चीनला


Comments

Top