HOME   महत्वाच्या घडामोडी

मारकुट्यांना उपचार नाहीत, एव्हीममध्ये परदेशी हात, न्यूझिलंडशी मुकाबला, खा. इम्तियाजविरुद्ध याचिका, प्रज्ञाची मोटारसायकल ओळखली, दिल्लीत भाजपा-कॉंग्रेसच्या बैठका....०९ जुलै २०१९

मारकुट्यांना उपचार नाहीत, एव्हीममध्ये परदेशी हात, न्यूझिलंडशी मुकाबला, खा. इम्तियाजविरुद्ध याचिका, प्रज्ञाची मोटारसायकल ओळखली, दिल्लीत भाजपा-कॉंग्रेसच्या बैठका....०९ जुलै २०१९

* आज लातुरच्या बाजारात: सोयाबीन ३६६०, तूर ५८८१ तर हरभरा पोचला ४५५५ रुपयांवर
* रिक्षाचालकांचा प्रस्तावित राज्यव्यापी बंद मागे
* राज ठाकरे यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट, राजकीय क्षेत्रात तर्क वितर्क
* भारतात वापरल्या जाणार्‍या एव्हीएममध्ये अमेरिकन चीप, परदेशी हात, ठाकरेंचा हल्लाबोल
* निवडणूक आयुक्तांशी बोललो पण उपयोग होणार नाही- राज ठाकरे
* डॉक्टरांना मारहाण करणार्‍या रुग्णांना आता उपचार मिळणार नाहीत!
* आयएमएच्या राज्यव्यापी पुस्तकात डॉक्टरांवर हल्ला करणार्‍यांची नावे छापणार
* कर्नाटकच्या सर्व २१ मंत्र्यांनी दिले राजीनामे, बंडखोर अजूनही नाराज
* कर्नाटकातील राजीनामा देणार्‍या १४ आमदारांना हलवलं गोव्याला
* आज भारताचा मुकाबला न्यूझिलंडसोबत
* पुण्याचे खडकवासला धरण सुमारे ६१ टक्के भरले
* पुण्यातही ५०० चौरस फुटांच्या मालमत्तांचे कर माफ करण्याची मागणी
* साईंच्या व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली फसवणार्‍या १२ जणांना अटक
* धर्माच्या नावावर मते मागितली, खा. इम्तियाज जलील यांच्याविरोधात याचिका दाखल
* तिवरे धरण दुर्घटना, २० वा मृतदेह लागला हाती
* तिवरे धरणाची शरद पवारांनी केली पाहणी, राष्ट्रवादीच्या फंडातून अपघातग्रस्त कुटुंबाला प्रत्येकी ०१ लाखाची आर्थिक मदत
* मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: साध्वी प्रज्ञाची मोटारसायकल साक्षीदाराने ओळखली
* वारकर्‍यांच्या वाहनांना टोलमाफी देण्याची मागणी
* चंद्रपुरच्या मेटेपार शिवारात तीन वाघ आढळले मृतावस्थेत
* भाजपाची आज नवी दिल्लीत सांसदीय मंडळाची बैठक
* आज कॉंग्रेसचीही बैठक, राहूल गांधी आणि सोनिया गांधी करणार बैठक
* मराठा आरक्षणाविरोधातील सुनावणी १२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात
* मुंबईत बेस्टचे किमान भाडे पाच रुपये, आजपासून अमलबजावणी
* नाशिकच्या गोदावरीच्या पुराचे पाणी धावले जायकवाडीकडे
* दिल्ली आणि लखनऊ दरम्यान धावणार ‘तेजस एक्स्प्रेस’ पहिली खाजगी रेल्वे
* औरंगाबादेत १५ ऑगस्टला खाजगी विमान सेवेची सुरुवात
* देशभरात पोलिसांची ०५.२८ लाख पदे रिक्त
* प्लास्टीकला पर्याय द्या अन्यथा सुटे दूध विकू, दूध संस्थांचा सरकारला इशारा
* कोयना धरणाची वीज निर्मिती सुरळीत
* राज्यातील ३०० धरणे धोकादायक स्थितीत
* निवडणूक आयोगावर भाजपाचा दबाव- राजू शेट्टी


Comments

Top