HOME   महत्वाच्या घडामोडी

अडीच तासांचं ग्रहण, कुलभूषण प्रकरणाचा फैसला, चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष, मोदींची मंत्र्यांना तंबी, राष्ट्रवादी-तृणमूल धोक्यात, सुरेश वाडकरांना पुरस्कार....१७ जुलै २०१९

अडीच तासांचं ग्रहण, कुलभूषण प्रकरणाचा फैसला, चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष, मोदींची मंत्र्यांना तंबी, राष्ट्रवादी-तृणमूल धोक्यात, सुरेश वाडकरांना पुरस्कार....१७ जुलै २०१९

* आज लातुरच्या बाजारात: सोयाबीन ३७११, तूर ६१०० तर हरभरा पोचला ४७०० रुपयांवर
* दलित पॅंथरचे संस्थापक राजा ढाले यांना आज लातुरच्या आंबेडकर चौकात श्रद्धांजली
* कुलभूषण जाधव प्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात फैसला
* १६ न्यायमूर्तींचं खंडपीठ देणार निर्णय, भारत-पाकिस्तानने मांडली बाजू
* ग्रामपंचायत सरपंचही घेणार पद आणि गोपनीयतेची शपथ
* दोन तास २९ मिनिटे चालले खंडग्रास चंद्रग्रहण
* १४९ वर्षांनंतर गुरु पौर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा योग
* राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जागा वाटप: राष्ट्रवादीला हव्या समान जागा
* डोंगरी इमारत दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू
* मुंबई मनापावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
* राजा ढाले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
* तिवरे धरणग्रस्त गाव सिद्धिविनायक मंदिर घेणार दत्तक, घरे देणार बांधून
* भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील, दानवेंचा राजीनामा
* आज गोपाळ काल्याने आषाढी यात्रेची सांगता
* नागपुरातील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याचे आदेश
* कर्नाटक राजीनामा प्रकरणी आज सर्वोचच न्यायालयाचा निर्णय
* गैरहजर मंत्र्याना मोदींची तंबी, म्हणाले मला सरळ करता येते!
* मुंबईतल्या कोस्टल रोडच्या कामाला न्यायालयाची बंदी
* सुरेश वाडकर यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
* पीक विमा प्रकरणी आज मुंबईत शिवसेनेचा मोर्चा, उद्धव ठाकरेही येणार
* शहिदांच्या कुटुंबियांना आता मिळणार २५ लाखांऐवजी एक कोटी रुपये, राज्य सरकारचा निर्णय
* बालाकोट एअर स्ट्राइकनंतर बंद केलेली हवाई हद्द पाकिस्तानकडून खुली
* विद्यावेतनाच्या मागणीसाठी राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर २२ जुलैपासून बेमुदत संपावर
* नाशिक: मुख्यमंत्री सेनेचाच होणार, भाजप कार्यालय परिसरात लावले फलक
* लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर पोस्टाचे तिकिट
* राष्ट्रवादी, तृणमूल, कम्युनिस्ट पक्षांचा राष्ट्रीय दर्जा धोक्यात
* चालू वर्षा अखेरपर्यंत एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण होणार
* चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागेल- नितीन गडकरी


Comments

Top