HOME   महत्वाच्या घडामोडी

नौटंकी आणि नालायक, नव्याने अश्विनी ये ना, चांद्र मोहीम २१-२२ ला, बिल गेट्स मागे, हाफीजला कोठडी, पन्हाळगडावर मारहाण, पंताला धोनीची साथ.....१८ जुलै १९

नौटंकी आणि नालायक, नव्याने अश्विनी ये ना, चांद्र मोहीम २१-२२ ला, बिल गेट्स मागे, हाफीजला कोठडी, पन्हाळगडावर मारहाण, पंताला धोनीची साथ.....१८ जुलै १९

* कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती, पाकची गोची
* अमेझॉनचे बर्नार्ड अरनाल्ड यांनी श्रीमंतीत बिल गेट्सना टाकले मागे
* विमा कंपनीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी काढला मोर्चा
* १५ दिवसात विमा प्रकरणे मार्गी लावण्याचा ठाकरेंचा इशारा
* शिवसेनेच्या मोर्चाला नौंटकी म्हणणारे नालायक- उद्धव ठाकरे
* चांद्रयान-२ जुलै महिन्याच्या २१-२२ तारखेला झेपावण्याची शक्यता
* कॉंग्रेसचा एक महाराष्ट्र कार्याध्यक्ष भाजपाच्या संपर्कात- चंद्रकांत पाटील
* अश्विनी ये ना....हे गाजलेले मराठी गाणे पुन्हा नव्या स्वरुपात
* आदित्य ठाकरे यांच्या ‘जन आशिर्वाद’ यात्रेची आज जळगावातून सुरुवात
* हाफीज सईदला लाहोरमध्ये न्यायालयीन कोठडी
* कर्नाटक विधानसभेत आज कुमारस्वामी सरकारला सिद्ध करावे लागेल बहुमत
* बंडखोर आमदारांना बहुमत चाचणीला हजर राहण्याची सक्ती नाही
* विधानसभेआधी महाविद्यालये आणि विद्यापिठातील निवडणुका होणार
* पन्हाळगडावर दारु पिणार्‍या तरुणांना शिवराष्ट्र संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
* पुण्यातून ९१ लाखांचे कोकेन जप्त
* नागपुरात दहशत माजवणार्‍या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड
* सतत रडणार्‍या स्वत:च्या मुलीची हत्या करणार्‍या मातेला नाशिकमध्ये अटक
* मालाडमध्ये भिंत कोसळून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या गेली ३० वर
* आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान, ७० जणांचा मृत्यू
* महेंद्रसिंग धोनी लगेच निवृत्त होणार नाही, पंतला तयार करणार
* कपिल देव यांची समिती ठरवणार भारतीय संघाचा नवा कर्णधार
* माझ्या वाढदिवसाला कोणताही बडेजावपणा नको मुख्यमंत्र्यांचे आवाहन
* मक्याचे बियाणे न उगवल्याने अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या
* पुण्यात भटक्या कुत्रीला मरेपर्यंत मारणार्‍याला अटक


Comments

Top