HOME   महत्वाच्या घडामोडी

कर्नाटक सरकार नापास, नवे तीन मेट्रो प्रकल्प, आयकर मुदतीला वाढ, आता मिशन सूर्या, महिला डब्यांना संरक्षण....२४ जुलै २०१९

कर्नाटक सरकार नापास, नवे तीन मेट्रो प्रकल्प, आयकर मुदतीला वाढ, आता मिशन सूर्या, महिला डब्यांना संरक्षण....२४ जुलै २०१९

* कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार बहुमत चाचणीत नापास, स्वामींचा राजीनामा
* कर्नाटकात लवकरच सत्तारुढ होणार भाजपाचे सरकार
* कर्नाटकनंतर मध्यप्रदेश आणि राजस्थानात भाजपा तोच ‘प्रयोग’ करण्याची शक्यता
* दोन दिवसात मुंबई कॉंग्रेसचा निर्णय- बाळासाहेब थोरात
* लातुरात राष्ट्रवादीच्या उमेदवार चाचपणीला केवळ १५ जणांनी दिला प्रतिसाद
* वंचित विकास आघाडीला लातुरात ७० इच्छुकांनी दिला प्रतिसाद
* लातुरातील राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक राजा मनियार वंचित बहुजन आघाडीत दाखल
* लातूर जिल्ह्यातील टंचाई उपाययोजना ३१ जुलैपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश
* मुंबईत आणखी दोन दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज
* मराठा क्रांती सेना विधानसभा लढणार
* बेस्ट सोडणार ३७ लेडीज स्पेशल बस
* राज्यातील नगर पंचायती, नगरपालिका आणि मनपा कर्मचार्‍यांना ०२ सप्टेंबरपासून सातवा वेतन आयोग
* आंध्रप्रदेश ७५ टक्के भूमीपुत्रांना देणार नोकर्‍या, भूमीपुत्रांना प्राधान्य
* चांद्रयान-२ नंतर इस्रोचे मिशन सूर्या!
* मुंबईत तीन मेट्रो प्रकल्पांना मंजुरी
* राज्यातील सर्व शाळात मराठी सक्तीची करा, साहित्यिकांची मागणी
* विद्या बालनचा ‘नटखट’ लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या सेवेत
* ३१ ऑगस्टपर्यंत आयकर भरता येणार
* सोशल मिडियाचा वापर समस्या सोडवण्यासाठी करा- आदित्य ठाकरे
* मुंबई लोकल रेल्वेत महिला डब्यांना पोलिस संरक्षण
* बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान
* औरंगाबादेत ‘जय श्रीराम’ प्रकरण घडलेच नाही! फिर्यादींची कबुली
* पाकिस्तानच्या मदतीमुळेच ओसामा लादेनचा खात्मा शक्य झाला- इम्रान खान
* देशातील २३ विद्यापिठे बोगस
* ०१ ऑगस्टपासून रेल्वे पोलिसांची ड्युटी फक्त आठ तास
* धनुर्वाताच्या प्रतिबंधासाठी आता टीटी ऐवजी टीडी इंजेक्शन
* सोलापुरात कृत्रिम पावसासाठी ढगांची पाहणी पूर्ण, औरंगाबादेतही तयारी


Comments

Top