HOME   महत्वाच्या घडामोडी

शेट्टी भेटले राणेंना,३० विद्यार्थ्यांचा सिनेमा, आज कर्नाटक सरकारची परिक्षा, ठरलंय पण सांगायचं नाही, क्रांती सेना लढणार १०० जागा....२९ जुलै २०१९

शेट्टी भेटले राणेंना,३० विद्यार्थ्यांचा सिनेमा, आज कर्नाटक सरकारची परिक्षा, ठरलंय पण सांगायचं नाही, क्रांती सेना लढणार १०० जागा....२९ जुलै २०१९

* नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी दाखवला ३० विद्यार्थ्यांना ‘सुपर ३०’ सिनेमा
* मनपा शाळेतील विद्यार्थी, दहावीचे विद्यार्थी, विद्यार्थीही तीसच!
* कॉंग्रेस भवनात त्र्यंबकदास झंवर यांना श्रद्धांजली
* माजी कुलगुरु जनार्दन वाघमारे यांना मानवसेवा जीवन गौरव पुरस्कार घोषित
* ३१ जुलै रोजी लातूर महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा
* कर्नाटक: येदीयुराप्पा सरकारची आज बहुमत चाचणी परिक्षा
* राजू शेट्टी भेटले नारायण राणे यांना, राजकीय तर्कांना ऊत
* घाटकोपरमध्ये शिवसैनिकाची हत्या, तिघांना अटक
* कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबला, दफ्तर दिरंगाई!
* सीआरपीएफच्या जवानाची नागपुरच्या आरबीआय कार्यालयात गोळी झाडून आत्महत्या
* कर्नाटकात भाजपाशी हात मिळवणी केल्याचा कुमारस्वामी यांच्यावर आरोप
* आमचं ठरलंय, पण आताच सांगायचं नाही- रावसाहेब दानवे
* माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे निधन
* भाजप-शिवसेनेकडून सत्तेचा दुरुपयोग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आरोप
* विरोधकांवर दबाव आणून त्यांना भाजपात आणलं जातंय- शरद पवार
* नेते पक्ष का सोडतात? याचं चिंतन शरद पवारांनी करावं- देवेंद्र फडणवीस
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणाऱ्या विचारवंतांविरोधात बिहार कोर्टात याचिका दाखल
* अकोल्याचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड आमदाराकीचा राजीनामा देणार, भाजपात जाणार
* पावसाचा अंदाज घेऊन शाळांना सुटी द्या, शिक्षणमंत्र्यांची मुंबईतल्या शाळांना सूचना
* राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांचा राजीनामा
* धनगर आरक्षण मेळाव्यासाठी प्रियांका गांधी आणि शरद पवार पंढरपुरात येणार
* शरद पवार आणि प्रियंका गांधी यांच्या पंढरपूर भेटीला धनगर समाजाचा विरोध
* मराठा क्रांती सेनेनं भाजप-सेना युतीकडे मागितल्या १० जागा
* युतीने सन्मान न दिल्यास मराठा क्रांती सेना विधानसभेच्या १०० जागा लढणार, ४२ संघटनांचा पाठिंबा
* खराब वातावरणामुळे अमरनाथ यात्रा स्थगित


Comments

Top