HOME   महत्वाच्या घडामोडी

महापौरांनी राजीनामा दिला नाही, ठाकरेंची यात्रा लातुरात, मुख्यमंत्र्यांची यात्रा, कोल्हेंची शिव स्वराज्य यात्रा, लादेनच्या मुलाचा खात्मा?....०१ ऑगस्ट २०१९

महापौरांनी राजीनामा दिला नाही, ठाकरेंची यात्रा लातुरात, मुख्यमंत्र्यांची यात्रा, कोल्हेंची शिव स्वराज्य यात्रा, लादेनच्या मुलाचा खात्मा?....०१ ऑगस्ट २०१९

* लातुरचे महापौर सुरेश पवारांनी राजीनामा दिलाच नाही, गडबडीत आटोपली सर्वसाधारण सभा
* दिवसभर लातुरात होती सुरेश पवारांच्या राजीनाम्याची चर्चा
* लातूर मनपाच्या अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी आणखी १५ दिवसांची मुदतवाढ
* औसा, लामजना आणि कासारशिरसी बस स्थानकांच्या बांधकामांची निविदा प्रसिद्ध
* लातूर महानगरपालिकेचे कुठलेही कर भरु नका, नागरिक कृती समितीचे आवाहन.
* आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा आज लातुरात
* ०९ ऑगस्टला मराठा समाज पुन्हा उतरणार रस्त्यावर, औरंगाबादेत आंदोलन
* आजपासून मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा, अमरावतीतून सुरुवात
* मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा फक्त भाजपासाठी मते मागणार की युतीसाठी? चवीने चर्चा
* जनादेश यात्रेनंतरच शिवसेना-भाजप युतीचा निर्णय होण्याची शक्यता
* आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून विधानसभा लढण्याची शक्यता
* लवकरच राष्ट्रवादीची शिव स्वराज्य यात्रा, अभिनेता अमोल कोल्हे करणार नेतृत्व
* खतांवरील सबसिडी थेट शेतकर्‍यांच्या खात्यांवर होणार जमा
* इव्हीएम विरोधात राज ठाकरे यांनी घेतली ममता बॅनर्जी यांची भेट
* इव्हीएम विरोधातील आंदोलनात सहभागी होण्याचे पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन
* वैभव पिचड, मधुकर पिचड, शिवेंद्रराजे, कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ भाजपात दाखल
* परभणीच्या सेलूत पेट्रोल पंपावर झोपलेल्या कर्मचार्‍याच्या अंथरुणात निघाला नाग
* काश्मीरचे नेते फारुख अब्दुल्ला यांची इडीकडून होणार चौकशी
* लादेनचा मुलगा हामजाला ठार केल्याचा अमेरिकेचा दावा
* पक्षविरोधी कारवाया करणार्‍या १४ आमदारांची कर्नाटक कॉंग्रेसने केली हकालपट्टी
* अयोध्या प्रकरणी मध्यस्थ समिती आज सादर करणार अहवाल, उद्या सुनावणी
* लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना 'भारतरत्न' द्यावा, विविध संघटनांची मागणी
* मराठवाड्यातील पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही- मुख्यमंत्री फडणवीस
* वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट दंड, राज्यसभेत विधेयक मंजूर


Comments

Top