HOME   महत्वाच्या घडामोडी

३७० कलम हटवल्यानं सरदार पटेलांचं स्वप्न पूर्ण, लोकसंख्या नियंत्रण, पंतप्रधानांचं नवं मिशन.....१५ ऑगस्ट २०१९

३७० कलम हटवल्यानं सरदार पटेलांचं स्वप्न पूर्ण, लोकसंख्या नियंत्रण, पंतप्रधानांचं नवं मिशन.....१५ ऑगस्ट २०१९

* आज देशाचा ७३ वा स्वातंत्र्यदिन
* पंतप्रधानांनी राजघाटावर महात्मा गांधींना केले अभिवादन
* ३७० कलम हटवल्यानं सरदार पटेलांचं स्वप्न पूर्ण, लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधानांचं समर्थन
* तिहेरी तलाकविरुद्ध कायदा, दहशतवादाविरुद्धची लढाई, शेतकर्‍यांना मदत अनेक उपायांचा उल्लेख
* सती प्रथा हटवू शकतो मग अन्यायकारक तीन तलाक प्रथा का हटवू शकत नाही? पंतप्रधानांचा प्रश्न
* पूरग्रस्तांच्या दु:खात सहभागी, सरकारी यंत्रणेकडून चांगली मदत होत असल्याचा दावा
* स्वप्न, संकल्प, सिद्धीसाठी सोबत चालण्याचे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
* चिफ ऑफ डिफेन्स या नव्या पदाची घोषणा
* दिल्लीतल्या सरकारी निवासस्थानी राजनाथसिंह यांनी केले ध्वजारोहण
* विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र प्रदान
* पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक रोषणाई, विठ्ठल रखुमाई तिरंगी वस्त्रात
* पूरस्थितीमुळे आयटीआयच्या प्रवेश वेळापत्रकात बदल
* स्वातंत्र्यदिनी प्लास्टीकचे ध्वज वापरण्यास मनाई
* आम आदमी पार्टी वंचितसोबत जाण्याची शक्यता
* काश्मिरातील निर्बंध १५ ऑगस्टनंतर उठवणार
* ३७० हटवले; भारतात महाभारत घडवायचंय का? असदुद्दीन ओवेसी यांचा सवाल
* पाकिस्तानात भारत विरोधी ब्लॅक डे, बलुचिस्तानात पाकिस्तानविरोधात ब्लॅक डे
* व्हाट्सअ‍ॅप आणणार फिंगर लॉक फिचर
* पाव्याप्त काश्मिरात भारताने कारवाई केल्यास युद्ध पुकारु, इम्रान खान यांची धमकी
* स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील महत्वाच्या वास्तूंवर आकर्षक विद्युत रोषणाई
* गृहमंत्री अमित शाह आज श्रीनगरमध्ये ध्वजारोहण करण्याची शक्यता
* जम्मू काश्मिरात मोठा बंदोबस्त तैनात
* २५ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांची 'मन की बात'
* राज्यावरील पूर संकटामुळे कर्मचारी व शिक्षकांचा संप तूर्त रद्द
* पश्चिम महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या ५० वर
* पूरग्रस्तांच्या कर्जमाफीसह पुनर्वसनासाठी पाठपुरावा करणार - शरद पवार
* नाना पाटेकरांनी दिली पूरग्रस्त भागास भेट, शिरोळमध्ये बांधणार ५०० घरे
* भारत-वेस्ट इंडीज: वन डे मालिका भारताने जिंकली


Comments

Top