HOME   महत्वाच्या घडामोडी

अणुबॉंबचा वापर करु, उजनीच्या पाण्याची चाचपणी, काश्मिरात इंटरनेट, पाकसोबत फक्त चीन, दिपाली सय्यद लावणार एक हजार मुलींची लग्ने.....१७ ऑगस्ट २०१९

अणुबॉंबचा वापर करु, उजनीच्या पाण्याची चाचपणी, काश्मिरात इंटरनेट, पाकसोबत फक्त चीन, दिपाली सय्यद लावणार एक हजार मुलींची लग्ने.....१७ ऑगस्ट २०१९

* आज लातुरच्या बाजारात सोयाबीन ३७३७, तूर ६००० तर हरभरा पोचला ४६११ रुपयांवर
* निलंग्यात चार धनगर उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
* लातूर जिल्हा बॅंक शेतकर्‍यांना देणार १०० कोटीची कर्जे
* औसा येथे शेतकर्‍यांच्या प्रश्नी दुष्काळ संघर्ष समितीने केले चटणी-भाकर आंदोलन
* दुष्काळाच्या मागणीसाठी औसा येथे छावा संघटनेचे उपोषण सुरु
* उजनीचे पाणी लातुरात आणण्यासाठी चाचपणी सुरु करा, पालकमंत्र्यांचे आदेश
* जम्मू काश्मिरातील इंटरनेट, टेलिफोन सेवा सुरु, पहिल्यांदा आली वर्तमानपत्रे
* अणुबॉंब वापराबद्दल राजनाथ सिंह यांचे सूचक वक्तव्य, पाकला गर्भित इशारा
* काश्मीर प्रश्नी पाकिस्तानसोबत फक्त चीन, बाकी देश भारतासोबत
* दहशतवाद थांबवला तर चर्चा करु, भारताची पाकिस्तानला सूचना
* ३७० कलम हटवल्यानंतर काश्मीरातील स्थिती हळूहळू पूर्वपदावर
* भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा रवी शास्त्री यांची निवड, कपिल देव यांच्याकडून घोषणा
* अक्षयकुमारच्या ‘मिशन मंगल’ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद २९ कोटींचा गल्ला
* प्रचाराच्या आखणीसाठी झाली भाजपाच्या प्रचार समितीसाठी बैठक
* मुंबईतील कामाठीपुरा रिता होऊ लागला, जागांचे भाव वाढल्याने महिलांचं अन्यत्र स्थलांतर
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची औरंगाबादेत महत्वाची बैठक सुरु
* पुण्यात टिक-टॉक फिल्म फेस्टीवलचे आयोजन
* राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची आज बैठक, पवारांच्या नेतृत्वाखाली सगळे नेते एकत्र
* मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक आजपासून सुरु होणार
* अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे पूरग्रस्तांना पाच कोटी, एक हजार मुलींची लग्नं लावून देणार
* अमित शाह यांनी रुग्णालयात जाऊन घेतली अरुण जेटली यांची भेट
* शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाले नारायण राणे यांच्या 'झंझावात' या आत्मचरित्राचे प्रकाशन
* नितीन गडकरी म्हणतात नारायण राणे सच्चा मित्र!
* प्रसिद्ध संगीतकार पद्मभूषण खय्याम रुग्णालयात दाखल, प्रकृती नाजूक
* सत्तेमध्ये आपलेच लोक असले तरी सगळेच चांगले असतील असे नाही- सरसंघचालक मोहन भागवत
* सत्तेत आम्ही हस्तक्षेप करतो पण लोकांच्या हितासाठी- मोहन भागवत यांचा खुलासा
* पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भुतानच्या दौर्‍यावर
* मराठी कलावंतांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद, सांगली-कोल्हापूरला मोठी मदत
* मलेशिया सरकारही करणार झाकीर नाईक आणि त्याच्या सहकार्‍यांची चौकशी
* बाळासाहेब थोरात यांनी घेतली कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट
* दिंडोरीचे राष्ट्रवादीचे माजी आमदार धनराज महाले शिवसेनेत दाखल
* मागच्या १० दिवसांत काश्मीरमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही
* कोल्हापूर व सांगलीतील पुरात ५४ जणांचा मृत्यु, चारजण अद्याप बेपत्ता
* न्यायालयाच्या परिसरात अस्वच्छता केल्याचे निष्पन्न झाल्यास तीन महिन्यांची शिक्षा


Comments

Top