HOME   महत्वाच्या घडामोडी

महाजनादेश लातुरात, लातुरसाठी वॉटर ग्रीड, पुन्हा नोटबंदी? उद्या ठाकरेंची चौकशी, चिदंबरमना होणार अटक, झाकीरची चौकशी, सोशल मिडियाला आधार....२१ ऑगस्ट २०१९

महाजनादेश लातुरात, लातुरसाठी वॉटर ग्रीड, पुन्हा नोटबंदी? उद्या ठाकरेंची चौकशी, चिदंबरमना होणार अटक, झाकीरची चौकशी, सोशल मिडियाला आधार....२१ ऑगस्ट २०१९

* लातुरात काल दोनदा पडला पाऊस, दुपारी १५ मिनिटे, रात्री अर्धा तास
* राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त लातुरात युवक कॉंग्रेसनं केलं साडी वाटप
* अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नरेंद्र पाटील आज लातूर दौर्‍यावर
* दुष्काळ निवारणासाठी तातडीने उपाय योजना करा, लातूर युवक कॉंग्रेसचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
* लातूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आज माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्कार
* लातुरच्या वैद्यकीय प्रतिनिधींनी पाठवली पूरग्रस्तांना औषधे
* लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याचा वॉटरग्रीडचा प्रस्ताव सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सादर करणार- पालकमंत्री निलंगेकर
* ३१ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा औसा येथे येणार; अहमदपूर, उदगीर आणि लातूर येथे सभा
* आ. अमित देशमुख यांनी केले नगरसेवक स्व. शिवकुमार गवळी कुटुंबियांचे सांत्वन
* मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सोलापुरातून होणार सुरुवात
* महाजनादेश यात्रा १४ जिल्ह्यातून जाणार
* कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा
* आमच्याकडे ढग आलेत, पाऊस पाडण्यासाठी विमान पाठवता का? औरंगाबादच्या विभाग कार्यालयात आले हजारो फोन
* देशात पुन्हा नोटबंदी, दोन हजारांच्या नोटा बंद होणार, सोशल मिडियावर मेसेज व्हायरल
* न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारताच माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम बेपत्ता, सीबीआयचे पथक घरी धडकले
* चिदंबरम यांचा फोन बंद, दोन तासात घरी हजर होण्याची सीबीआयकडून नोटीस, कधीही अटक होण्याची शक्यता
* मलेशियात झाकीर नाईकची दहा तास चौकशी
* इम्रान खान आणि नरेंद्र मोदी यांच्यात काश्मीरप्रश्नी गुप्त वाटाघाटी झाल्याचा खान यांच्या पहिल्या पत्नीचा दावा
* नेपाळमधून सोडलेल्या पाण्यामुळे उत्तरप्रदेशात पूर
* बीसीसीआयने श्रीशांतवरील बंदी हटवली
* छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर, शरद पवार यांच्याकडून मनधरणी झाल्याची चर्चा
* १४४ जागांवर लढण्याचा वंचितचा प्रस्ताव कॉंग्रेसनं नाकारला
* आदित्य ठाकरे आज पूरग्रस्त भागाचा दौरा करणार
* नवी मुंबईत माथाडी कामगारांकडून अधिकार्‍यांना मारहाण, कपडेही काढले
* देशभरातील ८२ हजार दारुगोळा कर्मचारी संपावर, खाजगीकरणास विरोध
* गुगल, यूट्यूब आधारशी लिंक करण्याबाबत केंद्राची नोटीस
* बंद पाळू नका, जनतेला वेठीस धरु नका, राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
* उद्या २२ तारखेला राज ठाकरे यांची ईडी करणार चौकशी
* अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आठव्या दिवशी नियमित सुनावणी
* राष्ट्रवादीचे नेते उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
* कार कर्जासाठी प्रक्रिया शुल्क घेणार नाही, अन्य कर्जातही सवलती, एसबीआयची घोषणा
* काश्मीर प्रकरणी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणार
* मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांची सलग दुसऱ्या दिवशी ईडीकडून आठ तास चौकशी
* गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविणार, मंत्रीमंडळाचा निर्णय
* ज्येष्ठ संगीतकार पद्मभूषण खय्याम यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
* कर्नाटकात येडीयुराप्पांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; १७ मंत्र्यांनी घेतली शपथ


Comments

Top