HOME   महत्वाच्या घडामोडी

अरुण जेटलींवर अंत्यसंस्कार, विलासरावांची जयंती वर्षभर, विद्यापिठासाठी धरणे, काश्मीर आलबेल नाही, ११९ गोविंदा जखमी, अमेझॉनच्या आगीसाठी लष्कर.....२५ ऑगस्ट २०१९

अरुण जेटलींवर अंत्यसंस्कार, विलासरावांची जयंती वर्षभर, विद्यापिठासाठी धरणे, काश्मीर आलबेल नाही, ११९ गोविंदा जखमी, अमेझॉनच्या आगीसाठी लष्कर.....२५ ऑगस्ट २०१९

* माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या पार्थिवावर दिल्लीच्या निगमबोध
* जायकवाडी धरणाला धोक्याची शक्यता, भिंतीवर जाण्यास मज्जाव
* उजनीचे पाणी लातुरला आणण्यासाठी सरकारने कसलेच प्रयत्न केले नाहीत, आ. अमित देशमुख यांचा आरोप
* लोकनेते विलासराव देशमुख यांची ७५ वी जयंती वर्षभर साजरी होणार
* विलासरावांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराचा २१ हजार जणांनी घेतला लाभ
* पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आज लातुरात, घेणार पाणी पुरवठ्याचा आढावा
* यकृत प्रत्यारोपण तज्ञ डॉ. विक्रम राऊत आज लातुरात
* लातुरात स्वतंत्र विद्यापीठ व्हावे या मागणीसाठी उद्या ११ वाजता गांधी चौकात धरणे आंदोलन
* बुलडाण्यात मुख्यमंत्र्यांच्या यात्रेमुळं पाच तास वीज पुरवठा खंडीत
* मुंबईकडे येणार्‍या खाजगी प्रवासी बसेस मुंबईबाहेरच थांबवल्या जाणार
* दारुगोळा कारखान्यातील कर्मचार्‍यांनी संप मागे घेतला
* पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेस डाव्यांसोबत आघाडी करणार, सोनिया गांधी यांचे संकेत
* अरुण जेटली यांच्यावर आज अडीच वाजता अंत्यसंस्कार, सर्वपक्षीय नेत्यांनी घेतलं अंत्यदर्शन
* अरुण जेटलींच्या निधनामुळं मुख्यमंत्र्यांनी स्थगित केली महा जनादेश यात्रा
* आणीबाणीत अरुण जेटली यांनी भोगला होता कारावास
* मी जवळच्या मित्राला मुकलो- नितीन गडकरी
* काश्मीरमध्ये सगळं काही आलबेल नाही- राहूल गांधी
* राहूल गांधी आणि विरोधकांना श्रीनगरच्या विमानतळावर रोखलं, परत दिल्लीला पाठवलं
* ठाण्यात मनसेकडून पूरग्रस्तांना साडेपाच लाखांची मदत
* दहीहंडी फोडताना ११९ गोविंदा जखमी, रायगडमध्ये एकाचा मृत्यू
* यापुढे शिवरायांची प्रतिमा असलेला भगवा झेंडाही लावा- अजित पवार
* अजित पवारांना उशिरा भगव्या झेंड्याची आठवण झाली- खा. संजय राऊत
* पंतप्रधानांनी आज युएई आणि बहारीनचा दौरा केला, युएईच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित
* खा. सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर सोलापुरात कारवाई
* खडसेंना राज्यात ठेवायचं की केंद्रात पाठवायचं याचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष घेतील- मुख्यमंत्री
* इंदापुरात अवैध वाळू नेणार्‍या ट्रॅक्टरने तहसिलदारांच्या गाडीला दिली धडक
* दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हिरेजडीत गणेश मूर्ती, अधिकार्‍यांनी नेली मुंबईहून
* अ‍ॅमेझॉन जंगलाला लागलेली आग विझवण्यासाठी लष्कराची मदत घेणार


Comments

Top