HOME   महत्वाच्या घडामोडी

सीए कोचेटा वसुंधरा रत्न, ज्योतिरादित्य ठरवणार कॉंग्रेसचे उमेदवार, अण्णांच्या तक्रारीत तथ्य नाही, अमोल कोल्हेंचा फेटा, सिंधू विश्व विजेती.....२६ ऑगस्ट २०१९

सीए कोचेटा वसुंधरा रत्न, ज्योतिरादित्य ठरवणार कॉंग्रेसचे उमेदवार, अण्णांच्या तक्रारीत तथ्य नाही, अमोल कोल्हेंचा फेटा, सिंधू विश्व विजेती.....२६ ऑगस्ट २०१९

* आम्हीच लिंगायतांना आरक्षण देऊ शकतो, जितेंद्र आव्हाड यांचा लातुरात दावा
* विकासरत्न विलासराव मांजरा कारखान्याकडून सभासदांना २५ रुपये किलो दराने साखर वाटप सुरु
* जलसंधारणाच्या उत्तम कामांसाठी लातुरचे सीए सुनील कोचेटा यांना वसुंधरा रत्न पुरस्कार
* अकोल्यात फवारणी करताना सात शेतकर्‍यांना विषबाधा, एकाचा मृत्यू
* राज ठाकरे आणि उन्मेष जोशींकडे इतके पैसे कुठून आले? मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सवाल
* माझ्या संपत्तीची होईल समान वाटणी, मुलीलाही मिळेल तिचा हक्क- अमिताभ बच्चन
* टेक्स्टाईल इंडस्ट्री अडचणीत लाखो जणांवर बेकारीची कुर्‍हाड
* मागच्या काही महिन्यात दोन कोटी लोकांचा रोजगार गेला, येत्या काळात एक कोटी रोजगार जाण्याची शक्यता- खा. संजय राऊत
* स्किल इंडीया, मेक इन इंडीया योजना अपयशी, परकीय गुंतवणूक आली नाही शिवसेनेचा आरोप
* औरंगाबादेतील तीन एमआयडीसीतील अनेक उद्योग आजारी, कामगारांची मोठी कपात
* औरंगाबादेतील विना अनुदानित शाळा शिक्षकांच्या वेतनासाठी आज राहणार बंद
* परळी, केजमध्ये राष्ट्रवादी जिंकेपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये फेटा बांधणार नाही- खा. अमोल कोल्हे
* सरकारने आपली इडीकडून चौकशी करुन दाखवावी- सुप्रिया सुळे
* सेना, भाजपाला किती जागा द्यायच्या याचा निर्णय मुख्यमंत्री, मी आणि अमित शाह घेतील- उद्धव ठाकरे
* वीज निर्मिती वाढल्यानं राज्य भारनियमनमुक्त- उर्जामंत्री बावनकुळे
* इतर पक्षातील नेत्यांना यापुढे फिल्टर लावूनच भाजपात प्रवेश- मुख्यमंत्री
* महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ज्योतिरादित्य शिंदे ठरवणार कॉंग्रेसचे उमेदवार
* भुजबळांना शिवसेनेत येण्याबाबत काहीच बोललो नाही, चिंता करण्याचे कारण नाही- उद्धव ठाकरे
* राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमाला संजय दत्त आले नाहीत, प्रचाराला येणार- महादेव जानकर
* साखर कारखान्याच्या खरेदी विक्री प्रकरणी अण्णा हजारे यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य नाही, सीबीआयचे मत
* जी-७ परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या पॅरिसमध्ये दाखल
* पी. चिदंबरम यांची कोठडी आज संपणार, आणखी कोठडी मिळावी यासाठी सीबीआय करणार प्रयत्न
* ३१ ऑगस्टला आ. दिलीप सोपल हाती शिवबंधन बांधण्याची शक्यता
* पश्चिम रेल्वेच्या ३०० स्थानकात मोफत वायफाय
* राष्ट्रवादाच्या नावाखाली काश्मीरचा आवाज दाबला जातोय- प्रियंका गांधी
* पूल खचल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात आजवर ५० जनावरे गेली वाहून
* होगार्ड्सना मिळणार वर्षातून २०० दिवस मिळणार रोजगार
* जम्मू काश्मीरच्या सचिवालयावर फडकला तिरंगा, काश्मीरचा झेंडा हटवला
* जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू अजिंक्य, महिला एकेरी स्पर्धेत पटकावले विजेतेपद
* पंतप्रधांनांनी केले सिंधूचे अभिनंदन, २० लाखांचे बक्षीस
* कसोटी सामन्यात भारताची वेस्ट इंडीजवर ३१८ धावांनी मात


Comments

Top