HOME   महत्वाच्या घडामोडी

महाराष्ट्रात ०२ कोटी ५५ लाख जनधन बँक खाती

पाच वर्षात जमा झाल्या ६,१३६ कोटींच्या ठेवी

महाराष्ट्रात ०२ कोटी ५५ लाख जनधन बँक खाती

नवी दिल्ली: प्रधानमंत्री जनधन योजनेत महाराष्ट्राने उल्लेखनिय कार्य केले असून गेल्या ०५ वर्षात राज्यात ०२ कोटी ५५ लाख ९३ हजार बँक खाते उघडण्यात आली आहेत. या बँक खात्यांत आजअखेर ६,१३६ कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. गेल्या एक वर्षाच्या कालावधीत ३१ लाखांहून अधिक बँक खाती उघडण्यात आली असून ठेवीमध्ये १,४८२ कोटी रूपयांची वाढ झाली आहे. देशातील प्रत्येक घरात बँक खाते असावे या उद्देशाने २८ ऑगस्ट २०१४ रोजी प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आली. आर्थिक समावेशनाला चालना मिळावी हा या योजनेचा प्रमूख उद्देश आहे. या योजनेअंतर्गत गेल्या पाच वर्षात देशभरात ३६ कोटी ६३ लाख ८२ हजार २७ बँक खाती उघडण्यात आली असून या बँक खात्यांत, आजअखेर १०२ लाख कोटी रुपयांच्या ठेवी जमा करण्यात आल्या आहेत.
गेल्या एका वर्षात ३१ लाख नवीन बँक खाती
महाराष्ट्रात गेल्या एका वर्षात (ऑगस्ट २०१८ ते ऑगस्ट २०१९) जनधन बँक खात्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ऑगस्ट २०१८ अखेर महाराष्ट्रात ०२ कोटी २४ लाख ०५ हजार ७०८ बँक खाती उघडण्यात आली होती. गेल्या वर्षभरात यामध्ये ३१ लाख ८७ हजार ३०४ नवीन बँक खात्यांची भर पडली असून आजअखेर महाराष्ट्रात ०२ कोटी ५५ लाख ९३ हजार १२ इतकी बँक खाती जनधन योजनेच्या माध्यमातुन उघडण्यात आली आहेत. ऑगस्ट २०१८ अखेर जनधन बँक खात्यांमध्ये ४,६५३ कोटी ६९ लाख रुपयांच्या ठेवी जमा होत्या, गेल्या वर्षभरात या ठेवीमध्ये १४८२ कोटी ८९ लाख रुपयांची भर पडली असून आजअखेर महाराष्ट्रातील जनधन बँक खात्यांमध्ये ६,१३६ कोटी ५८ लाख रुपयांच्या ठेवी जमा आहेत.
०१ कोटी ८२ लाख रुपे कार्डचे वितरण
गेल्या पाच वर्षात जनधन योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ०१ कोटी ८२ लाख ७४ हजार ७३५ रुपे कार्डचे वितरण करण्यात आले आहेत. ऑगस्ट २०१८ अखेर ही संख्या ०१ कोटी ५६ लाख इतकी होती, गेल्या वर्षभरात २६ लाखाहून अधिक नवीन रूपे कार्डचे वितरण करण्यात आले आहे. देशभरात आज अखेर २८ कोटी ९७ लाख २४ हजार ५६८ रूपे कार्ड वितरीत करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात देशात ०४ कोटीहून अधिक रूपे कार्ड वितरीत झाले आहेत.


Comments

Top