HOME   महत्वाच्या घडामोडी

रानूला पैसा मिळताच परतली मुलगी, ठाकरेंचे मौन, पवारांसह ७६ जणांवर गुन्हा, दोन्ही कॉंग्रेस २५ वर्षे विरोधी बाकांवर? सेनेला १०८ जागा शक्य, अणुयुद्धाची धमकी.....२७ ऑगस्ट २०१९

रानूला पैसा मिळताच परतली मुलगी, ठाकरेंचे मौन, पवारांसह ७६ जणांवर गुन्हा, दोन्ही कॉंग्रेस २५ वर्षे विरोधी बाकांवर? सेनेला १०८ जागा शक्य, अणुयुद्धाची धमकी.....२७ ऑगस्ट २०१९

* आज लातुरच्या बाजारात; सोयाबीन ३७२६, तूर ५६२६ तर हरभरा पोचला ४४२७ रुपयांवर
* मुख्यमंत्र्यांना विरोधकांसह पक्षातील विरोधकही संपवायचे आहेत- प्रकाश आंबेडकर
* वंचित बहुजन आघाडीन कॉंग्रेसने दिली ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत
* वंचित बहुजन आघाडीचा जाहिरनामा प्रसिद्ध
* काल झालेल्या लाठीचार्जनंतर मुंबईत विना अनुदानित शिक्षकांनी केले आंदोलन तीव्र
* शिक्षकांच्या आंदोलनाचा २२ वा दिवस, जीआर निघेपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार
* पहिल्या महिला पोलिस महासंचालक कांचन चौधरी भट्टाचार्य यांचे निधन
* लातुरकरांना मोकळा श्वास घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात ही बाब दुर्दैवी- आ. अमित देशमुख
* लातूर जिल्ह्यात आजवर झाला ३७.६१ टक्के सरासरी पाऊस
* महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी घेतली आ. अमित देशमुख यांची भेट
* स्टार प्रवाह वरील ‘एक टप्पा आऊट’ कॉमेडी शोमध्ये लातुरचा बालाजी सूळ आला तिसरा
* बुधवारपर्यंत नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात जायकवाडीचे पाणी पोहोचण्याची शक्यता
* रानू मंडल यांना पैसा आणि प्रसिद्धी मिळताच परत आली मुलगी!
* भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर उद्धव ठाकरे यांचे मौन, योग्यवेळी निर्णय घेण्याचे अप्रत्यक्ष संकेत
* राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकणी अजित पवारांसह ७६ नेत्यांवर गुन्हा दाखल
* राज्य सहकारी बॅंकेतील घोटाळाप्रकरणी शरद पवार अडचणीत येण्याची शक्यता
* पवारांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता, सुडाच्या राजकारणानं तळ गाठला- राष्ट्रवादी
* दोन्ही कॉंग्रेसला आता २५ वर्षे विरोधी बाकांवरच बसावं लागेल- मुख्यमंत्री
* पी. चिदंबरम यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ, पुढची सुनावणी ३० तारखेला
* बॉश कंपनीनं आठ दिवसांसाठी उत्पादन थांबवलं, टाटाचंही पावलावर पाऊल
* सीबीआयसीच्या २२ वरिष्ठ अधिकार्‍यांना सक्तीची सेवा निवृत्ती
* मनसे नाशिकमधील विधानसभेच्या सर्व जागा मनसे स्वबळावर लढवणार
* भाजपाला १८० तर शिवसेनेच्या वाट्याला १०८ जागा येण्याची शक्यता
* भारत आणि पाकिस्तानातील सगळे प्रश्न द्वीपक्षीय, दुसर्‍या देशांना आम्ही त्रास देणार नाही- पंतप्रधान
* पतंजलीचे सीईओ बालकृष्ण यांच्यावर विष प्रयोग झाल्याची चर्चा, एम्समध्ये घेतले उपचार
* पाकिस्तानने पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली अणुयुद्धाची धमकी
* रिझर्व बॅंकेची केंद्राला एक लाख ७६ हजार कोटी रुपयांची मदत, मंदीतून सावरण्याचा प्रयत्न
* उस्मानाबादचे पाटील पिता-पुत्र पक्ष सोडण्याच्या मन:स्थितीत
* विरोधकांकडून भाजप नेत्यांवर मारक शक्तीचा प्रयोग- साध्वी प्रज्ञासिंह
* मुंबई, औरंगाबाद आणि नाशिकमध्ये विना अनुदानित शिक्षकांनी केली आंदोलने
* सोन्याचे दर ४० हजार २२० रुपये प्रति तोळा, भाव आणखी वाढण्याची शक्यता
* माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा काढली
* मुलीची छेड काढल्यावरुन नंदुरबार रेल्वे स्थानकात दगडफेक
* जन औषधी केंद्रामध्ये आजपासून सॅनिटरी नॅपकीन एक रुपयात मिळणार


Comments

Top