HOME   महत्वाच्या घडामोडी

सलमानचा गणपती, डीएड महाविद्यालये अडचणीत, अण्णा रुग्णालयात, चांगली बायको मिळू दे! इथेनॉल महागले, डॉक्टरांवर हल्ला-दहा वर्षांची शिक्षा..... ०४ सप्टेंबर १९

सलमानचा गणपती, डीएड महाविद्यालये अडचणीत, अण्णा रुग्णालयात, चांगली बायको मिळू दे! इथेनॉल महागले, डॉक्टरांवर हल्ला-दहा वर्षांची शिक्षा..... ०४ सप्टेंबर १९

* विधानसभा निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यात २० निवडणूक कक्ष
* लातुरच्या अंबाजोगाई मार्गावर शॉक लागलेल्या पाचही कामगारांची प्रकृती स्थिर
* शिवसेनेशी युती करा, तडजोड नको, पंतप्रधान आणि अमित शाहांच्या सूचना
* सात सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते नागपुरात रेल्वे मार्गाचे लोकार्पण
* औरंगाबाद-नाशिक बसचा चालक दारु पिलेला असल्याने शिवशाही रद्द
* भाजपाला २२९ जागा मिळण्याची शक्यता, सर्वेतून निष्पन्न
* मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली कोअर कमिटीची बैठक, चालली उशिरापर्यंत
* कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आज बैठक, आघाडीबाबत निर्णय शक्य
* भाजपात येण्यासाठी विरोधातील आणखी चार आमदार उत्सुक- रावसाहेब दानवे
* चांगली बायको मिळू दे, बिअर शॉपीचं लायसन्स मिळू दे, साहेबाची बदली होऊ दे....गणपतीच्या दानपेटीत बाप्पाला पत्रे!
* 'लालबागच्या राजा'ला अज्ञात गणेशभक्ताकडून ०१ किलो २३७ ग्रँम वजनाची सोन्याची भांडी दान
* ३१ हजार महिलांनी केलं पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण
* गणपतीच्या मिरवणुकीत अभिनेता सलमान खाननं धरला ठेका
* १६-१७ सप्टेंबरला महाजनादेश यात्रा कोल्हापुरात येणार
* पूरग्रस्त भागातील मुलींच्या लग्नासाठी मदत करणार, चंद्रकांत पाटील यांची घोषणा, दानशुरांना आवाहन
* राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजभवनात निरोप
* नवी नांदेड-औरंगाबाद रेल्वे सुरु, मोठा प्रतिसाद
* जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणातील सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांची नाशिक कारागृहात रवानगी
* उरणच्या ओएनजीसीत लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू
* प्रकृती अस्वास्थ्यामुळे अण्णा हजारे रुग्णालयात दाखल
* इथेनॉलच्या दरात डिसेंबरपासून वाढ, ५९.४८ रुपये
* डीएड महाविद्यालये अडचणीत, १४७ महाविद्यालयात यंदा एकही प्रवेश नाही
* भाजप, संघ आणि बजरंग दलाला पाकिस्तानी गुप्तचरांची मदत, असे वक्तव्य करणार्‍या दिग्विजय सिंगांविरुद्ध गुन्हा
* जम्मू काश्मीरातील सरपंचांना सुरक्षा आणि विम्याचं संरक्षण कवच
* जम्मू काश्मीरात महाराष्ट्र सरकार उभारणार दोन रिसोर्ट, दोन कोटी मंजूर
* विकास दर घटल्यानं शेअर बाजार कोसळला
* डॉक्टरांवरील हल्ला ठरणार अजामीनपात्र गुन्हा, १० वर्षे कारावासाची तरतूद
* मनी लॉड्रिंग प्रकरणी काँग्रेसचे बडे नेते डीके शिवकुमार यांना ईडीकडून अटक
* पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया भेटीवर
* भारतीय हवाई दलात 'अपाचे' हेलिकॉप्टर दाखल, हवाई दलाची ताकद वाढणार
* कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी घेतली 'वर्षा'वर मुख्यमंत्र्यांची भेट
* पी चिदंबरम यांना तिहार तुरुंगात पाठवण्याची सीबीआयची मागणी
* अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू
* महिला क्रिकेटपटू मिताली राजची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा


Comments

Top