HOME   महत्वाच्या घडामोडी

बनसोडे भेटले आ. देशमुखांना, लातूर जिल्ह्यात ६३ टॅंकर, कपिलधार वाहू लागले, वंचितमध्ये गडबड, राजे भाजपात जाऊ नका, भुजबळांना सेनाबंदी.....०५ सप्टेंबर १९

बनसोडे भेटले आ. देशमुखांना, लातूर जिल्ह्यात ६३ टॅंकर, कपिलधार वाहू लागले, वंचितमध्ये गडबड, राजे भाजपात जाऊ नका, भुजबळांना सेनाबंदी.....०५ सप्टेंबर १९

* राष्ट्रवादीचे युवा नेते संजय बनसोडे यांनी घेतली आ. अमित देशमुख यांची भेट
* विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशमुख-बनसोडे यांच्यात चर्चा
* आ. अमित देशमुख आज करणार कोळपा येथील नियोजित सरकारी दवाखान्याच्या जागेची पाहणी
* पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर उद्या लातुरात घेणार भाजपा पदाधिकार्‍यांची बैठक
* ज्येष्ठा गौरी पुजनानिमित्त शुक्रवारी लातूर जिल्ह्यात स्थानिक सुट्टी जाहीर
* लातूर जिल्ह्यात आजवर झाला ४९.७९ टक्के पाऊस
* लातूर जिल्ह्यात ५५ गावांमध्ये ६३ टँकरने अद्यापही पाणी पुरवठा सुरु
* मांजरसुंबा येथील कपिलधारचा धबधबा वाहू लागला
* शिवसेनेसोबत युती करा, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सूचना
* पावसामुळे हजारो मुंबईकरांनी काढली रेल्वेस्थानकावर रात्र, लोकल रेल्वे वाहतूक दिवसभर विस्कळीत
* मुंबईत रात्री पाऊस थांबला, तिन्ही मार्गावरील वाहतूक सुरु
* सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, कोयनेतून मोठा विसर्ग सुरु
* मित्रपक्षाने केला घात, हर्षवर्धन पाटील १० तारखेला भाजपात जाण्याची शक्यता
* राजे तुम्ही भाजपात जाऊ नका, राजू शेट्टी यांची उदयनराजे यांना विनंती
* एमआयएमने मागितल्या ९८ जागा, आंबेडकर ०८ जागा देण्यास तयार, वंचितमध्ये फूट शक्य
* भविष्यातला मुख्यमंत्री वंचित बहुजन आघाडीचा- प्रकाश आंबेडकर
* माळी समाज महासंघाने वंचित बहुजन आघाडीकडे केली ५० जागांची मागणी
* छगन भुजबळांना शिवसेनेत येऊ देणार नाही, राणेंच्या भाजपा प्रवेशाला विरोध नाही- खा. संजय राऊत
* सिंधुदुर्गातील २७ गावांचा संपर्क तुटला, पुन्हा अतिवृष्टी
* कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
* आजपासून महसूल कर्मचार्‍यांच्या राज्यव्यापी संपाला सुरुवात
* मारुती-सुझुकीचे उत्पादन दोन दिवस बंद
* मादाम तुसा म्युझियममध्ये श्रीदेवीचा मेणाचा पुतळा, बोनी कपूर करणार अनावरण
* मनी लॉड्रिंग प्रकरणी कर्नाटकातील काँग्रेसचे दिग्गज नेते डीके शिवकुमार यांना ईडीकडून अटक
* नव्या दहशवादविरोधी कायद्यानुसार मसूद अजहर, हाफिज सईद व दाऊद इब्राहिम दहशतवादी घोषित
* केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मानेवर किरकोळ शस्त्रक्रिया, रुग्णालयातून सुटी
* माजी मंत्री प्रकाश आवाडे कॉंग्रेस सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता
* पंजाबच्या गुरुदासपुरात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, २२ जणांचा मृत्यू
* भाजपाकडून कॉंग्रेस नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाया- सुशीलकुमार शिंदे
* प्रियंका गांधी घेणार कॉंग्रेसच्या जिल्हानिहाय बैठका
* लंडनमध्ये पाकिस्तानी नागरिकांकडून भारतीय उच्चायुक्तालयासमोर हुल्लडबाजी, अंडी फेकली
* फेसबुकवरील टॅग आणि लाईक बंद होणार


Comments

Top