HOME   महत्वाच्या घडामोडी

पहिल्या यादीत आ. अमित देशमुख, उद्धव लहान भाऊ, मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या, इम्तियाज जलील नाराज, कोल्हापुरला पुराचा धोका....०८ सप्टेंबर २०१९

पहिल्या यादीत आ. अमित देशमुख, उद्धव लहान भाऊ, मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या, इम्तियाज जलील नाराज, कोल्हापुरला पुराचा धोका....०८ सप्टेंबर २०१९

* कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सुमारे १३० उमेदवार निश्चित केल्याची चर्चा
* पहिल्या यादीत लातुरचे आमदार अमित देशमुख यांचे नाव असल्याची माहिती
* आ. अमित देशमुख पक्षांतर करण्याच्या चर्चांना मिळाला विराम
* अमित देशमुख यांच्या विरोधात कोण याकडे लातुरचे लक्ष
* येत्या काही दिवसात लातुरातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक स्थानिक नेते पक्षांतर करण्याची शक्यता
* आज लातुरच्या दयानंद सभागृहात द्वारकादास शामकुमार यांच्या वतीने एक हजार शिक्षकांचा गौरव
* लातूर जिल्ह्यात आजवर झाला केवळ ५२ टक्के पाऊस
* सिद्धेश्वर देवस्थानने केली पूरग्रस्तांना पाच लाखांची मदत
* घरावर संकट आलं म्हणून पळून जायचं का? प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा सवाल
* येत्या दोन ते चार दिवसात युतीचे जागावाटप निश्चित होणार
* लोखंडी सळया तयार करणारे जालन्याचे तीन उद्योग बंद
* डॉक्टरांना मारहाण केल्यास पाच वर्षांचा कारावास आणि पाच लाखांपर्यंतचा दंड शक्य
* सरकारने गड किल्ल्यांऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत- राज ठाकरे
* गड किल्ले प्रकरणी राष्ट्रवादीने केले शनिवार वाड्यासमोर आंदोलन
* श्रीरामपुरचे कॉंग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत
* मुंबईतली २३ उद्यानं २४ तास राहणार खुली
* मुंबई पंतप्रधानांनी केलं विविध विकास प्रकल्पांचं उदघाटन
* मोदींनी लहान भाऊ म्हणून केला उद्धव ठाकरे यांचा उल्लेख
* ओवेसी यांना विश्वासात घेऊनच वंचित आघाडी तोडली- खा. इम्तियाज जलील
* औरंगाबादच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रम पत्रिकेत खा. इम्तियाज जलील यांचं नाव नसल्यानं नाराजी
* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी प्रकाश मुगदिया यांची नियुक्ती
* परवानगी न घेता वर्गणी जमा करणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई होणार
* भारताच्या राष्ट्रपतींच्या विमानाला हवाई हद्दीत येऊ देण्यास पाकिस्तानचा नकार
* औरंगाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून केली भाषणाची सुरुवात
* औरंगाबादेत पंतप्रधान मोदींनी केलं ऑरिक स्मार्ट सिटीचं लोकार्पण
* कोल्हापुरच्या राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे खुले, भोगावती नदीत विसर्ग, महापुराची भिती
* पुणे: गडकिल्ल्यांना भाड्यावर देण्याचा निर्णय घेणाऱ्या भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादीचे शनिवारवाडा येथे निषेध आंदोलन
* राज्यात युतीचंच सरकार येणार- उद्धव ठाकरे
* त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि. ल. धारूरकर यांनी लाच प्रकरणातील आरोपांमुळे दिला राजीनामा
* नियमबाह्य वाहतूक दंड पद्धतीला दिवाकर रावते यांचाही विरोध
* नियमबाह्य वाहतूक दंड पद्धती निवडणुकीनंतर अमलात येण्याची शक्यता
* चंद्राजवळ पोचलेल्या विक्रम लॅंडरची स्थिती १२ दिवसांनी समजणार


Comments

Top