HOME   महत्वाच्या घडामोडी

सहा आमदार पाच वर्षे पाण्यात, कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी उद्या, रक्तदानसाठी हवे आधार, सांगली-कोल्हापुरात पूरस्थिती, उदयनराजेंचे आज ठरणार.....०९ सप्टेंबर २०१९

सहा आमदार पाच वर्षे पाण्यात, कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी उद्या, रक्तदानसाठी हवे आधार, सांगली-कोल्हापुरात पूरस्थिती, उदयनराजेंचे आज ठरणार.....०९ सप्टेंबर २०१९

* लातूर जिल्ह्यातील आमदारांनी विधानसभेत पाण्यावर उपस्थित केले सर्वाधिक प्रश्न
* २२१ वेळा प्रश्न मांडूनही लातुरचा पाण्याचा प्रश्न तसाच
* निवडणुकीच्या तोंडावर फक्त औशाच्या पाणी प्रश्नावर झाला निर्णय
* उजनीचे गाजर, धरणजोड आणि वॉटर ग्रीडकडे वळवले सरकारने लातुरकरांचे लक्ष
* कॉंग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार उद्या १० तारखेला
* कॉंग्रेसने केली ६० तर राष्ट्रवादीने केली ७० उमेदवारांची यादी निश्चित
* भाजपा निवडणूक समितीची आज बैठक
* स्टार एअर विमान कंपनीने सुरु केली देशांतर्गत प्रवासी वाहतूक सेवा
* रक्तदान करताना आधार कार्ड आवश्यक
* विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे आंदोलन, आज शाळा बंद राहण्याची शक्यता, जुनी पेन्शन लागू करण्याची शिक्षकांची मागणी
* विक्रम लॅंडर चंद्रावर सुस्थितीत असल्याचा इस्रोचा दावा, निश्चित स्थान कळाले
* पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाण्यात पाढ, सांगली आणि कोल्हापुरकरांना पुन्हा पुराचा धोका
* कोल्हापूर, सांगलीच्या पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे सुरु
* सांगलीत पुन्हा एनडीआरएच्या पथकाला पुन्हा केले पाचारण
* गडचिरोली जिल्ह्यातही पुराचा धोका, ३०० गावांचा संपर्क तुटला
* महाबळेश्वरात पुराचा विक्रम, चेरापुंजीलाही टाकले मागे
* पुण्यातील भिडे पूल पुन्हा पाण्याखाली
* अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी यांनी घेतले लालबागच्या गणपतीचे दर्शन
* धनंजय मुंडे यांच्या ताफ्यातील गाडीला एक्सप्रेसवेवर लोणावळ्याजवळ अपघात, दोघेजणांना मुका मार
* राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक बुधवारी करणार भाजपात प्रवेश
* खा. उदयनराजे आज घेणार भाजपातील प्रवेशाचा निर्णय
* ओवेसी जोवर काही बोलत नाहीत तोवर एमआयएमशी युती कायम- प्रकाश आंबेडकर
* विकायला काहीच शिल्लक नाही, म्हणून सरकारने काढले किल्ले विकायला- प्रकाश आंबेडकर
* एमआयएम स्वबळावर, १० तारखेपासून इच्छुकांच्या मुलाखती
* मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आता आठवड्यातून चारवेळा धावणार
* अनेक भारतीयांनी भितीपोटी केली स्वीस बॅंकेतील खाती
* मंदीमुळे मालेगावातील शेकडो पॉवरलूम पडले बंद
* पुण्यातील मुठा नदीत शर्यत लावून उडी मारणारा तरुण बेपत्ता
* सरकारवरील टीका देशद्रोह ठरु शकत नाही- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सीपक गुप्ता
* गुप्त माहिती देणार्‍या खबर्‍यांचाच छळ, पुण्यातील दोन सहाय्यक पोलिस फौजदार निलंबित
* गाळप हंगाम एक डिसेंबरपासून सुरु करा, राज्य सहकारी साखर महासंघाची मागणी
* राज्यात पाच वर्षात राज्यात साठ लाखजणांना मिळाला कायमस्वरुपी रोजगार, सरकारचा दावा
* आजपासून मुंबईत इलेक्ट्रीक बस धावणार
* सचिन तेंडुलकरने केले चांद्रयान मोहीम आणि शास्त्रज्ञांचे कौतुक


Comments

Top