HOME   महत्वाच्या घडामोडी

उद्या कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार

कॉंग्रेसने ६० तर राष्ट्रवादीने केली ७० उमेदवारांची यादी, आघाडीची घोषणा नाही

उद्या कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार

मुंबई: कॉंग्रेसच्या पहिल्या दहा उमेदवारांची यादी उद्या १० तारखेला जाहीर होणार आहे. आघाडीची अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. कॉंग्रेसच्या पहिल्या दहा जणांच्या यादीत विश्वजित कदम, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, मुजफ्फर हुसेन, संजय बागवे, भाई जगताप यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी १३८ जागा लढवतील. १२ जागा मित्रपक्षांना दिल्या जातील. सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या उपस्थितीत विदर्भातून प्रचाराचा नारळ फोडला जाईल. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाडांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.


Comments

Top