HOME   महत्वाच्या घडामोडी

लातुरला आयुक्तालय होणारच, लातुरात जमल्या २९ हजार गणेश मूर्ती, २१ तास मिरवणूक, पाक-चीनचा कांदा, महाजनादेश बारामतीत.....१४ सप्टेंबर २०१९

लातुरला आयुक्तालय होणारच, लातुरात जमल्या २९ हजार गणेश मूर्ती, २१ तास मिरवणूक, पाक-चीनचा कांदा, महाजनादेश बारामतीत.....१४ सप्टेंबर २०१९

* लातुरात लवकरच होणार नवे आयुक्तालय, पालकमंत्र्यांनी दिली माहिती
* लातुरकरांनी २९ हजार गणेश मूर्ती दिल्या प्रशासनाकडे, नगरसेवक मंगेश बिराजदारांच्या शेतात ठेवल्या मूर्ती
* आ. अमित देशमुख आज करणार विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण
* लातूर जिल्ह्यात वाढले २६ हजार ३०२ मतदार
* लातूर बाजार समिती शेतमालाची विक्री किंमत देणार ऑनलाईन
* उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील सेवकाने केली आत्महत्या
* उद्या अरण येथे माळी महासंघाचा राज्यस्तरीय मेळावा, प्रकाश आंबेडकर येणार
* उदयनराजे यांनी दिला खासदारकीचा राजीनामा, आज करणार भाजपात प्रवेश, मुख्यमंत्र्यांसोबत दिल्लीला रवाना
* आयारामांना संघ परिवाराचा विरोध
* खा. सुप्रिया सुळे यांच्याशी गैरवर्तन करणार्‍या टॅक्सीचालकाला अटक
* पुण्याच्या प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचे कृत्रिम तलावात विसर्जन
* लालबागच्या राजाची मिरवणूक चालली २१ तास
* सोनिया गांधी यांनी घेतली महत्वाच्या कॉंग्रेस नेत्यांची बैठक
* एन्कॉऊंटर स्पेशॅलिस्ट प्रदीप शर्मा शिवसेनेत दाखल
* नेते सोडून गेले पण कार्यकर्ते कायम- शरद पवार
* शरद पवार पुढच्या आठवड्यात राज्याच्या दौर्‍यावर निघणार
* केंद्र सरकार पाकिस्तान, इजिप्त, चीनमधून कांदा मागवणार
* लासलगावात कांद्याचे भाव वाढले
* केंद्र सरकारने कांदा आयातीचा निर्णय घेतल्यास शेतकरी संघटना करणार आंदोलन
* विधानसभा लढायची की नाही यावर मनसेत मतभेद
* राज ठाकरे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते, मी विधानसभेची निवडणूक लढवणार!
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांची महाजनादेश यात्रा आज बारामतीत
* विरोधकांनी २५ वर्षे तरी सत्तेची स्वप्ने पाहू नयेत, मुख्यमंत्र्यांना कॉन्फीडन्स
* मुंबईत कॉंग्रेस लढणार २९ तर राष्ट्रवादी लढणार सात जागा
* डबेवाले संघटनेचे नेते भाऊसाहेब करवंदे यांचे बॉंबे रूग्णालयात निधन
* भाजपला शेतकऱ्यांची नव्हे तर फक्त व्यापाऱ्यांचीच चिंता आहे- बाळासाहेब थोरात
* मुंबई ते दिल्लीदरम्यान धावणारी प्रीमियम राजधानी एक्स्प्रेस चार दिवस, रेल्वेमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा
* फेसबुक, व्हाट्सअ‍ॅपकडून भारतीय कायद्याचे पालन होत नाही, तामिळनाडू सरकारचा आरोप
* २१ सप्टेंबरपासून पंतप्रधान अमेरिकेच्या दौर्‍यावर
* कॉंग्रेस नेते डीके शिवकुमार चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल
* दिल्ली विद्यापिठातील निवडणुकीत अभाविपची बाजी
* दिल्लीत ट्रकचालकाला नव्या वाहतूक नियमानुसार दोन लाख पाच हजार रुपयांचा दंड


Comments

Top