HOME   महत्वाच्या घडामोडी

आंबेडकरांचे आटोपते भाषण, राजेंना हवा सहनशीलतेचा पुरस्कार, ठाकरे म्हणतात गाफील नका राहू, जायकवाडी ओसंडून, आठवलेंना हव्या १० जागा.....१६ सप्टेंबर १९

आंबेडकरांचे आटोपते भाषण, राजेंना हवा सहनशीलतेचा पुरस्कार, ठाकरे म्हणतात गाफील नका राहू, जायकवाडी ओसंडून, आठवलेंना हव्या १० जागा.....१६ सप्टेंबर १९

* परतीचा पाऊस लांबण्याची शक्यता
* जायकवाडी धरण भरले, चार दरवाजे उघडले, मोठा विसर्ग सुरु
* प्रकाश आंबेडकरांच्या सभेला लातुरात जोरदार प्रतिसाद
* लांबत गेलेल्या इतरांच्या भाषणांमुळे आंबेडकरांना घ्यावे लागले आटोपते
* वंचितचा लातुरचा उमेदवार घोषित न झाल्यानं मंचावरील अनेक उत्सुक संभाव्य उमेदवारांची निराशा
* बसवंतपूर, वरवंटी, रायवाडी, खोपेगाव आणि वासनगाव येथे आज आ. अमित देशमुख करणार विकासकामांचे भूमीपूजन
* मुख्यमंत्री म्हणतात, वाहतूक नियमभंगासाठी केंद्राने लागू केलेली दंडवाढ अमलात येणारच
* शरद पवार आज नाशिकमध्ये, घेतल्या पळपुट्या नेत्यांचा समाचार
* युती होईल पण गाफील राहू नका, उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना इशारा
* प्रामाणिक असतील तर मुख्यमंत्र्यांनी विभागनिहाय दिलेल्या रोजगाराची आकडेवारी द्यावी- अशोक चव्हाण
* कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी लढणार प्रत्येकी १२५ जागांवर, ३८ जागा मित्र पक्षांसाठी
* युतीने रिपाइंला द्याव्यात १० जागा, रामदास आठवले यांची मागणी
* शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि पदधिकाऱ्यांची मातोश्रीवर झाली बैठक
* भाजपाची महाजनादेश यात्रा आज कोल्हापूर आणि सांगलीत
* सत्तेच्या गोटात जाण्यासाठी होते ती फक्त फितुरी असते- अमोल कोल्हे
* लग्न नाही निवडणूक महत्वाची, लढायला तयार आहे- आदित्य ठाकरे
* युतीची घोषणा १९ सप्टेंबरला घोषणा होण्याची शक्यता
* उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
* राष्ट्रवादीनं मला किमान सहनशिलतेचा तरी पुरस्कार द्यायला हवा होता- उदयनराजे भोसले
* सातार्‍यात होणार मेडीकल कॉलेज, उदयनराजेंच्या साक्षीनं मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
* एक देश एक भाषा, अमित शाह यांच्या आवाहनाला तामिळनाडूचा विरोध
* कांद्याची आवक घटली, ४० ते ५० रुपयांवर पोचला भाव
* येत्या नोव्हेंबर महिन्यापासून अयोध्येत सुरु होणार राम मंदिराची उभारणी- सुब्रमण्यम स्वामी
* अभिनेता संजय दत्तने घेतली नितीन गडकरी यांची भेट
* इंग्लंडमधलं ३५ कोटी रुपये किमतीचं सोन्याचं कमोड गेलं चोरीला
* अतिरेकी हल्ल्यांमुळे सौदी अरेबियातील तेलाचे उत्पादन आले निम्म्यावर
* भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातला पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द


Comments

Top