HOME   महत्वाच्या घडामोडी

आ. देशमुखांकडे दारुबंदीची मागणी, उद्या शरद पवार लातुरात, पंतप्रधानांचा वाढदिवस, इंधन महागणार, चार दिवस बॅंका बंद, कर्तृत्वहिनांना जातीचा आधार.....१७ सप्टेंबर २०१९

आ. देशमुखांकडे दारुबंदीची मागणी, उद्या शरद पवार लातुरात, पंतप्रधानांचा वाढदिवस, इंधन महागणार, चार दिवस बॅंका बंद, कर्तृत्वहिनांना जातीचा आधार.....१७ सप्टेंबर २०१९

* अवैध दारु विक्री बंद करा, भामरी चौकातील नागरिकांची आ. अमित देशमुख यांच्याकडे मागणी
* सरकारने घरकुल योजनेचा कोटा घटवला, आ. अमित देशमुख यांचा आरोप
* लातूर महावितरणचे जनसंपर्क अधिकारी मोहन दिवटे यांना पीएचडी जाहीर
* शरद पवार उद्या लातुरात, मुक्ताई मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक
* लातुरकरांनी दान केलेल्या मुर्त्या नेण्यास मुर्तीकारांकडून सुरुवात
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६९ वा वाढदिवस, आईची भेट घेणार
* सौदी अरेबियात पेट्रोलचे उत्पादन कमी झाल्याने भारतात पाच ते सहा रुपयांनी भाववाढ होण्याची शक्यता
* भारताला इंधनाची कमतरता जाणवू देणार नाही, सौदी अरेबियाचे आश्वासन
* २६ आणि २७ सप्टेंबरला बॅंक कर्मचार्‍यांच्या संप, पुढे दोन दिवस सुट्या, चार दिवस व्यवहार ठप्प
* चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात विधानसभा लढणार, राजू शेट्टी यांचा निर्धार
* विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅंकात होणार्‍या मोठ्या उलाढालींवर लक्ष
* दिवाळीच्या आधी विधानसभेसाठी होईल मतदान, शरद पवार यांचा अंदाज
* उदयनराजे यांना अन्याय कळायला १५ वर्षे लागली, शरद पवार यांचा टोमणा
* भाजपाने केली २८८ विधानसभा मतदारसंघांची चाचपणी
* कॉंग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ जागा लढवणार, ३८ जागा मित्र पक्षांना
* भगवे झेंडे वापरण्याचा निर्णय एकट्या अजित पवारांचा, पक्षाचा नव्हता, वरिष्ठांकडून खुलासा
* शरद पवार आज सोलापूर आणि उस्मानाबादमध्ये
* भाजपाची जनादेश यात्रा आज कोकणात, आधी कोल्हापुरात रॅली काढणार
* फक्त आरक्षणाने विकास होत नाही, कर्तृत्व नसणारे जातीचा आधार घेतात- नितीन गडकरी
* शरद पवारांच्या नाशिक दौर्‍याला छगन भुजबळ यांची अनुपस्थितीत, समीर भुजबळांवर बैठकीची जबाबदारी
* महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात पंतप्रधानांकडून युतीची घोषणा होण्याची शक्यता नाही
* महामार्ग आणि मुख्य रस्त्यांवरील जाहिरातींच्या फलकांवर स्वयंस्वी संस्थांचा आक्षेप, लक्ष विचलित होऊ शकते
* हैद्राबाद मुक्तीसंग्रामाच्या ध्वजारोहणाला खा. इम्तियाज जलील यांची अनुपस्थिती
* इडीच्या नोटिसा दाखवून माझ्या सहकार्‍यांना धमकावण्यात आले, शरद पवार यांचा आरोप
* काश्मीर शांत हवा, स्थिती पूर्वापदावर आली पाहिजे, न्यायालयाने बजावले सरकारला
* गोविंद पानसरे हत्येप्रकरणातील तीन संशयित आरोपींच्या पोलिस कोठडीत २० सप्टेंबरपर्यंत वाढ
* सांगली मार्गावरील मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फेकल्या कडकनाथ कोंबड्या आणि अंडी
* राष्ट्रावर हिंदी भाषा लादू नका, तामिळनाडूच्या डीएमकेचा इशारा, आंदोलनाची तयारी
* एक भाषा एक देश एक भाषा, अभिनेता कमल हसन यांचाही विरोध
* पंतप्रधान नरेंद्र मोदी व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची १८ सप्टेंबर रोजी बैठक
* पंढरपुरच्या इंग्रजी शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यावर अश्लील वर्तनाचा आरोप, काढून टाकले


Comments

Top