HOME   महत्वाच्या घडामोडी

१३ दलित संघटना अमित देशमुखांच्या पाठीशी, सोनिया-सिंगांनी चिदंबरम यांना दिला गप्प राहण्याचा आदेश?....२४ सप्टेंबर २०१९

१३ दलित संघटना अमित देशमुखांच्या पाठीशी, सोनिया-सिंगांनी चिदंबरम यांना दिला गप्प राहण्याचा आदेश?....२४ सप्टेंबर २०१९

* १३ दलित संघटनांनी दिला लातूर कॉंग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांना पाठिंबा
* लष्कर ए भीमा, भीम आर्मी, ब्लू फोर्स ग्रुप, सम्राट ग्रुप, एकता ग्रुप, दलीत कोब्रा संघटनेचा समावेश
* बाभळगावच्या निवासस्थानी या संघटनांनी दिले प्रत्यक्ष समर्थनाचे पत्र
* गावात मोबाईलला रेंज नसल्यानं मतदानावर बहिष्कार, औरंगाबाद जिल्ह्यातील कळंकी गावाचा निर्णय
* अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिराचीच, मुस्लीम पक्षकारांची कबुली
* अयोध्येतील वादग्रस्त जागेप्रकरणी मुस्लिमांना पूर्ण बेदखल करु नका, मुस्लीम पक्षकारांची मागणी
* काश्मीरातील ५० हजार मंदिरं पुन्हा खुली होणार
* एक देश एकच ओळखपत्र, पंतप्रधानांचा प्रस्ताव
* सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांनी घेतली तिहार कारागृहात पी चिदंबरम यांची भेट
* पी चिदंबरम यांनी गुपितं जाहीर करु नयेत म्हणून सोनियांनी घेतली भेट, सुधीर मुनगंटीवारांची आरोप
* काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार, पण भारताची तयारी हवी, डोनाल्ड ट्रंप यांचा प्रस्ताव
* झाकीर नाईकला फरार घोषित करण्याचा इडीचा प्रस्ताव
* आज होणार युतीची घोषणा, मुख्यमंत्र्यांच्या घरी झाली उशिरापर्यंत बैठक
* चार तास चालली बैठक, आज भाजपाची पत्रकार परिषद
* भाजपाकडून शिवसेनेला ११५ जागांची ऑफर, सेनेला अमान्य
* एमआयएमकडून आजवर १२ उमेदवारांची घोषणा, पाच जागा मुंबईतल्या
* मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष मिलींद देवरा भाजपाच्या वाटेवर
* पक्षात आल्यानंतर भाजपच्या पहिल्याच मेळाव्याला उदयनराजे यांची अनुपस्थिती
* भाजपात दाऊदचे हस्तक- नवाब मलिक
* २६ ऑक्टोबरला अमित शाह पुन्हा मुंबईच्या दौर्‍यावर
* महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं जाहीर केली सात उमेदवारांची यादी
* व्हाट्सअ‍ॅपचं स्टेटस आता दिसणार फेसबुकवर
* पुण्यात स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई, १० ते १५ दिवसांची प्रतिक्षा
* २६ आणि २७ सप्टेंबर रोजीचा बॅंक कर्मचार्‍यांचा संप स्थगित
* आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
* शिवसेना आमदारांची आज होणार मातोश्रीवर बैठक


Comments

Top