HOME   महत्वाच्या घडामोडी

रमेशअप्पा कराड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

दोन दिवसात भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत अधिकृत उमेदवारी दाखल करणार

रमेशअप्पा कराड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

लातूर: ज्यांच्यावर श्रध्दा आहे अशा मार्गदर्शकांनी केलेल्या सुचनेवरुन लातूर ग्रामीण भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षातर्फे कोणताही गाजावाजा न करता मुहूर्त साधून मोजक्याच भाजपाच्या लोकप्रितिनी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. दरम्यान येत्या दोन दिवसात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाचा अधिकृत उमेद्वारी अर्ज रमेशअप्पा कराड दाखल करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले लोकाभिमुख निर्णय आणि ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकास कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करुन आणल्याने लातूर ग्रामीण भाजपाचे नेते रमेशअप्पा कराड यांनी ग्रामीण विधानसभा मतदार संघातील गावागावात जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून भाजपाचे मोठे वातावरण निर्माण केले. भाजपा नेते रमेशअप्पा कराड यांच्यासमवेत यावेळी भाजपाचे लातूर ग्रामीण विधानसभा प्रमुख तथा रेणापूर पसचे सभापती अनिल भिसे, रेणापूरचे नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, भाजपाचे लातूर तालुकाध्यक्ष विजय काळे, रेणापूर तालुकाध्यक्ष ॲङ दशरथ सरवदे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश लहाने, कृउबा संचालक भागवत सोट, गोविंद नरहरे, भाजपा किसान आघाडीचे हनुमंत नागटिळक, रेणापूर पसचे उपसभापती अनंत चव्हाण, संगायोचे लातूर तालुका अध्यक्ष साहेबराव मुळे, रेणापूर तालुका अध्यक्ष श्रीकिसन जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य सतिश आंबेकर, गंगासिंह कदम, जिल्हा चिटणीस वसंत करमुडे, शरद दरेकर, रेणापूर पसचे गटनेते रमेश सोनवणे, लातूर पसचे गटनेते भैरवनाथ पिसाळ, डॉ. बाबासाहेब घुले, जिल्हा दक्षता समिती सदस्य चंद्रकांत कातळे, तालुका सरचिटणीस बन्शी भिसे, विनायक मगर, विशाल शिंगडे, सुरज शिंदे, शामसुंदर वाघमारे, विधी आघाडीचे ॲङ धनराज शिंदे, रेणापूर नपचे बांधकाम सभापती दत्ता सरवदे, श्रीकृष्ण मोटेगावकर, भाजयुमोचे रेणापूर तालुकाध्यक्ष नरसिंग येलगटे, औस तालुकाध्यक्ष राजकिरण साठे, रेणापूरचे नगरसेवक विजय चव्हाण, श्रीकृष्ण पवार, संतोश चव्हाण, सुधाकर गवळी, प्रताप पाटील, अनंत कणसे, अंतराम चव्हाण, काशीनाथ ढगे, किसान आघाडीचे श्रीमंत नागरगोजे, विश्वांभर कावळे, पांडूरंग बालवाड, भाऊसाहेब गुळबिले, वैजनाथ हराळे, संजय चव्हाण, श्रीकांत सुर्यवंशी, मदन दहिफळे, अन्वर सय्यद, बापुराव बिडवे, गोपाळ पवार, राज जाधव, किसन क्षिरसागर, नारायण राठोड, अच्युत पिसाळ, नामदेव मांडे, मधुकर बिडवे, अनंत शिंदे, प्रशांत शिंदे, श्रीकांत कुंभार, अमर पुदाले, शरीफ सय्यद, सुनिल पाटील, विकास शिंदे, पप्पु घुटे, अच्युत भोसले, रफिक शिकलकर, सचिन लटपटे, साहेबराव कराड, प्रेमकुमार शिंदे, रोहित पाटील, किरण रोंगे यांच्यासह लातूर ग्रामीण मतदार संघातील भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनीधी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top