HOME   महत्वाच्या घडामोडी

अरविंद पाटील यांची भूकंपातील मृतांना श्रध्दांजली

मृती स्तंभ, स्मृती वनाचे नूतनीकरण, सुशोभिकरण, किल्लारीकरांकडून आभार

अरविंद पाटील यांची भूकंपातील मृतांना श्रध्दांजली

किल्लारीः किल्लारी परिसरात विनाशकारी भूकंपात अनेकांचे संसार उध्वस्त झाले. हजारोंचे प्राण गेले. अनेकांना कायमचे अपंगत्व आले. अनेकजण निपुत्रिक झाले या भूकंपातून सावरत-सावरत आज परिसरातील नागरीकांचे जीवन पूर्वपदावर आले असले तरी त्या विनाशकारी भूकंपाच्या आठवणी वेदनादायक आहेत. अरविंद पाटील निलंगेकर यांनी किल्लारी येथील स्मृती स्तंभाला श्रध्दांजली वाहिली. भूकंपामुळे लातूरची ओळख देशभरात झाली असली तरी ही ओळख निश्चितच लातूरसाठी वेदना देणारी आहे. भूकंपात जी हानी झाली ती भरून निघणार नसली तरी आता केवळ स्मृती शिल्लक राहिली असून त्या स्मृतींना जतन करण्याचे काम या स्मृती स्तंभाच्या माध्यमातून होत आहे. भूकंपग्रस्तांच्या मदतीला हजारो जणांनी मदतीचा हात पुढे केला होता. बहुतांश जणांचे पुर्नवसन झालेले असून त्यांच्या अडचणी सोडविण्यात आलेल्या आहेत. मात्र आणखी ज्या काही अडचणी शिल्लक असतील त्या शासनस्तरावर सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र भूकंपात मयत झालेल्यांच्या स्मृती कायम जाग्रत रहाव्या हा उद्देश मनी धरून अरविंद पाटील निलंगेकर यांनी किल्लारी परिसरात भूकंपात बळी गेलेल्यांच्या स्मृती कायम जतन व्हाव्यात यासाठी पुढाकार घेवून किल्लारी येथे स्मृती वन व स्मृती स्तंभ उभा करण्याच्या सूचना केल्या होत्या. याबाबत वनविभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे गेल्या वर्षभरापूर्वी स्मृती वन साकारले गेले असून याठिकाणी स्मृती स्तंभाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या स्मृतीवनात आल्यानंतर रम्य वाटावे याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून हिरवळीचा गालिचा आहे. ३० सप्टेंबरला अरविंद पाटील निलंगेकर तेथे पोहचल्यानंतर तेथे जमा झालेल्या नागरिकांनी अरविंद पाटील निलंगेकर यांना धन्यवाद देत आपल्या पुढाकारातून हे काम झाले असल्याबद्दल आभार व्यक्त केले. नायब तहसिलदार केसकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सर्वांनी मानवंदना दिली. यावेळी बंकट पाटील, प्रकाश पाटील, सरपंच शैलजा लोहार, उपसरपंच पोतदार, अमर बिराजदार, व्यंकट मुळजे, आनंद बाभळसूरे, सुर्यकांत बाभळसूरे, वैजनाथ बाभळसूरे, गोविंद भोसले, विजय भोसले, सतिश भोसले, सरपंच बाबूराव बिराजदार, रवी जाधव, विजय औंढे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top