HOME   महत्वाच्या घडामोडी

रमेश कराडांचं काय होणार? मनियारांची उमेदवारी दाखल, खडसेंना नाही मुलीला मिळाली उमेदवारी!....०४ ऑक्टोबर १९

विधानसभा स्पेशल....विधानसभा स्पेशल...

रमेश कराडांचं काय होणार? मनियारांची उमेदवारी दाखल, खडसेंना नाही मुलीला मिळाली उमेदवारी!....०४ ऑक्टोबर १९

* एकनाथ खडसे यांच्या ऐवजी मुलगी रोहिणी खडसेंना मिळाली उमेदवारी, अर्जही दाखल
* वंचित बहुजन आघाडीचे लातुरचे उमेदवार राजा मनियार यांनी दाखल केली उमेदवारी
* रमेश कराड यांच्या समर्थकांनी गांधी चौकात केली निदर्शने, ग्रामीण मतदारसंघ परत देण्याची मागणी
* कराड लढणार अपक्ष म्हणून, भाजपचे दात घशात!
* उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस
* मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, छगन भुजबळ आज अर्ज करणार दाखल
* भाजपच्या तिसर्‍या यादीतही खडसे, बावनकुळे, प्रकाश मेहतांची नावे * नाहीत
* एकनाथ खडसे आज ११ वाजता करणार भूमिका जाहीर
* मुख्यमंत्र्यांच्या घरी भाजपा नेत्यांची बैठक चालली रात्री दोन वाजेपर्यंत
* आज उद्धव ठाकरे आणि फडणवीस घेणार संयुक्त पत्रकार परिषद
* अभिनेत्री दिपाली सय्यद शिवसेनेत दाखल, बांधून घेतले शिवबंधन
* मातोश्रीसमोर शिवसेनेच्या नाराजांनी केली होती गर्दी
* आदित्य ठाकरे यांच्याकडे ११ कोटी ३८ लाख!
* रोहित पवारांकडे १८ कोटींची संपत्ती!
* मनसेनं जाहीर केली तिसरी ३२ उमेदवारांची यादी
* संजय निरुपम कॉंग्रेसवर नाराज, प्रचारात सहभागी होणार नाहीत
* महात्मा गांधी मुस्लिमांची स्तुती करायचे, त्यामुळेच त्यांची हत्या झाली- असदुद्दीन ओवेसी
* १५ दिवसात होणार केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार, सुरेश प्रभुंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता
* पंजाब महाराष्ट्र बॅंकेतून आता काढता येणार २५ हजार रुपये, घोटाळा प्रकरणी दोघांवर कारवाई
* मुंबई क्रिकेट असोशिएशनची आज निवडणूक


Comments

Top