HOME   महत्वाच्या घडामोडी

समता परिषद आघाडीच्या पाठीशी, पंतप्रधानांच्या ०९ सभा, ४७३९ उमेदवारांचे अर्ज वैध, एचपीची कामगार कपात, इंधन दरात कपात.....०७ ऑक्टोबर १९

समता परिषद आघाडीच्या पाठीशी, पंतप्रधानांच्या ०९ सभा, ४७३९ उमेदवारांचे अर्ज वैध, एचपीची कामगार कपात, इंधन दरात कपात.....०७ ऑक्टोबर १९

* आ. अमित देशमुख यांची आज भांडी व्यावसायिकांची भेट, महा आघाडीची पत्रकार परिषद
* अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा लातूर जिल्ह्यातील कॉंग्रेस उमेदवारांना पाठिंबा
* उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
* बंडोबांना थंड करण्याचा भाजप आणि शिवसेनेचा प्रयत्न
* राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला मैदान मिळेना, अलका चौकात सभा घेण्याचा इशारा
* अजित पवार यांच्या प्रचारासाठी मुलगा जय पवार मैदानात
* पंतप्रधान महाराष्ट्रात ०९ तर अमित शाह १८ सभा घेणार
* यंदा महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार
* १२ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात मोठा पाऊस होण्याचा अंदाज
* देशाला नवे राष्ट्रपिता मिळाले असतील तर महात्मा गांधींना रिटायर करा- तुषार गांधी
* प्रणिती शिंदे यांनी पाच किलोमीटर अनवाणी चालत घेतले देवीचे दर्शन
* मराठा समाजाला आर्थिक मागासलेपणावर आरक्षण मिळते मग मुस्लिमांना का नाही? असदुद्दीन ओवेसी यांचा सवाल
* उमेदवारांच्या संमतीशिवाय सोशल मिडीयावर प्रचार करता येणार नाही
* पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात, सणासुदीत दिलासा
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध, सगळे आक्षेप फेटाळले
* मुंबईत आचारसंहिता कालावधीत १० कोटींचा मुद्देमाल जप्त
* संरक्षणमंत्री राजनाथ सिंह राफेल विमानांची डिलिव्हरी घेण्यासाठी फ्रान्सच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर
* प्रकाश आंबेडकर यांच्या अटकेच्या निषेधात अकोल्यात झाला रास्ता रोको
* उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ १७ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साताऱ्यात सभा
* राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ४७३९ उमेदवारांचे अर्ज वैध
* कांद्यावरील निर्यात बंदी हटवावी यासाठी ०७ ऑक्टोबरपासून राज्यात कांदा सत्याग्रह
* बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी घेतली सोनिया गांधीं, मनमोहनसिंग यांची भेट
* एचपी संगणक कंपनी करणार १० टक्के कपात
* दिवाळी आणि छटपूजेसाठी उत्तर रेल्वेच्या ३४ विशेष गाड्या
* आरे वृक्षतोड प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
* जालना जिल्ह्यात वीज कोसळल्याने तिघांचा मृत्यू
* उर्मिला मातोंडकर कॉंग्रेसच्या प्रचारात सहभागी होण्याची शक्यता
* बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न फक्त मीच करतोय- रामदास आठवले
* शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करु नये, ते शक्य नाही, रामदास आठवले यांचा सल्ला


Comments

Top