HOME   महत्वाच्या घडामोडी

द्या उजनीचे पाणी, डेंग्यूत वाढ, युती कायम रहावी संघाची इच्छा, आता कुत्रेही खा, आयपीएल सेल डिसेंबरमध्ये.....०६ नोव्हेंबर २०१९

द्या उजनीचे पाणी, डेंग्यूत वाढ, युती कायम रहावी संघाची इच्छा, आता कुत्रेही खा, आयपीएल सेल डिसेंबरमध्ये.....०६ नोव्हेंबर २०१९

* विविध प्रश्नांवर लातूर कॉंग्रेसचे आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
* लातूर जिल्ह्यात डेंग्युच्या रुग्णात वाढ
* अहमदपूर तालुक्यातील सांगवी, सुनेगाव येथे उद्धव ठाकरे यांनी केली शेतीच्या नुकसनीची पाहणी
* मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, सर्वप्रथम शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देणार- उद्धव ठाकरे
* सात नोव्हेंबरपर्यंत लातूर जिल्ह्यातील शेतीचे सर्व पंचानामे पूर्ण करण्याचा प्रयत्न
* लातुरात सोयाबीनला आला ३९२६ रुपयांचा भाव
* उजनीचे पाणी पाईपलाईनने लातुरला द्या, आ. अमित देशमुख यांनी केली राज्यपालांकडे मागणी
* आगामी दोन दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता
* नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे वीज बिल माफ करा, हेक्टरी एक लाखाची मदत द्या- अजित पवार
* पंजाब महाराष्ट्र बॅंकेच्या ग्राहकांना आता काढता येणार पन्नास हजार रुपये
* सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली सरसंघचालकांची भेट
* युती कायम रहावी ही सरसंघचालकांची इच्छा!
* भाजपाने लेखी प्रस्ताव दिल्यास शिवसेना चर्चेसाठी तयार
* मुदतीआधी सरकार स्थापन न झाल्यास भाजप, सेनेचे आमदार फुटण्याचा तज्ञांचा अंदाज
* देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, गोड बातमी लवकरच मिळणार- सुधीर मुनगंटीवार
* शरद पवार आज मुंबईत घेणार पत्रकार परिषद
* दिल्ली पोलिसांनी घेतलं आंदोलन मागे, सगळ्या मागण्या मान्य
* राज्यातील शेतीच्या नुकसानी प्रकरणी आज सर्व पालकमंत्र्यांची मुंबईत बैठक
* पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क होणार * माफ
* 'आयपीएल'च्या स्पर्धांसाठी खेळाडूंचा डिसेंबर महिन्यात होणार लिलाव
* एसटीने केलेली दहा टक्क्यांची हंगामी तिकीटवाढ घेतली मागे
* केंद्रातील मंत्रिमंडळाची आज संसद परिसरात बैठक
* उस्मानाबातील ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे गुरुवारी होणार प्रकाशन
* काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे निधन
* गोमांस खाणार्‍यांनी कुत्र्याचेही मांस खावे- पश्चिम बंगाल भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष


Comments

Top