HOME   महत्वाच्या घडामोडी

सोनी टीव्ही आणि बच्चन यांनी मागितली माफी, सलमानला अ‍ॅक्शन सीन कठीण, दुमदुमली पंढरी, फडणवीस शिवसैनिक? राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे.....०८ नोव्हेंबर २०१९

सोनी टीव्ही आणि बच्चन यांनी मागितली माफी, सलमानला अ‍ॅक्शन सीन कठीण, दुमदुमली पंढरी, फडणवीस शिवसैनिक? राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे.....०८ नोव्हेंबर २०१९

* सत्तेचा पेच कायम, भाजपा किंवा सेनेकडून अद्याप दावा नाही
* भाजपाकडून अन्य आमदारांना ५० कोटींची ऑफर, कॉंग्रेसचा आरोप, भाजपाने फेटाळला
* छत्रपती शिवरायांच्या एकेरी उल्लेखाबद्दल सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी
* आज भाजपाच्या कोअर कमिटीची वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक
* भाजपा महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न राबवण्याच्या तयारीत, राष्ट्रवादी नेत्यांचा आरोप
* भाजपा आणि शिवसेनेत कुणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही- संजय राऊत
* बाहेरुन येणारे फोन रेकॉर्ड करा, शिवसेना आमदारांना आदेश
* शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांची मातोश्रीवर बैठक
* भाजपाने बोलावली मुंबईत आमदारांची बैठक
* फोडाफोडी होऊ नये म्हणून कॉंग्रेस आमदारांना पाठवणार जयपुरला
* जनार्दन साठे महाराज खून प्रकरणी लातूर शिवसेनेच्या विष्णू साठेंना अटक
* लातुरात मालमत्ता कर एकरकमी भरणार्‍यांना व्याजात मिळणार सवलत
* लातूर जिल्ह्यातील ११३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
* लातुरच्या महाराष्ट्र नागरी बॅंकेच्या कर्मचार्‍यांना मिळाला २० टक्के बोनस
* एकाच दिवशी ग्रामसभा घेऊन पीक नुकसानीचे पंचनामे करा- पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर
* टंचाई काळात चार महिने सारोळाच्या गावकर्‍यांना मोफत पाणी पुरविणार्‍या भारत ढोपरे यांचा आ. धीरज देशमुख यांनी केला सत्कार
* उस्मानाबादेत होणार्‍या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह प्रकाशित
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राजीनामा देण्याची शक्यता
* पण, फडणवीसांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून १५ दिवसांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता
* कॉंग्रेस आपल्या आमदारांना आज राजस्थानात नेण्याची शक्यता
* भाजपा फोडाफोडीत सराईत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप
* देवेंद्र फडणवीसांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार येईल
* अल्पमतातील सरकार स्थापन करायचे नाही, सेनेसोबतच स्थिर सरकार देणार- सुधीर मुनगुंटीवार
* देवेंद्र फडणवीसांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार- सुधीर मुनगंटीवार
* सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवसेना-भाजपाचे अप्रत्यक्ष कान टोचले
* संभाजी भिडे यांना उद्धव ठाकरे यांनी नाकारली भेट
* राज्यपाल सत्ता स्थापनेबाबत कार्यवाही का करीत नाहीत? त्यांच्यावर दबाव आहे का? कॉंग्रेस प्रवक्यांचा प्रश्न
* शेतकऱ्यांना मदत जाहीर केली नाही तर राज्यपालांच्या निवासस्थानावर मोर्चा काढू- आ. बच्चू कडू
* सत्ता स्थापनेची वाट बिकट, राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल
* माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन
* अयोध्या निकाल: सर्व राज्यांना केंद्राने दक्ष राहण्याच्या केल्या सूचना
* स्टेच्यू ऑफ युनिटीला वर्षात झाली ६४ कोटींची कमाई
* कौन बनेगा करोडपतीमध्ये छत्रपती शिवरायांचा मानहानीकारक उल्लेख, अमिताभ बच्चन यांच्यावर टिकेची झोड
* सोनी चॅनलवर बहिष्कार टाका, केबीसीवर बहिष्कार टाका, सोशल मिडियावर आवाहने
* कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात येणार्‍या भाविकात मोठी घट
* चंद्रकांत पाटील यांनी केली विठ्ठलाची पूजा
* भाजपा-सेनेतील संघर्ष ही टेंपररी फिल्म- चंद्रकांत पाटील
* मला युती तोडायची नाही, निर्णय भाजपाने घ्यावा- उद्धव ठाकरे
* वाढत्या वयानुसार अक्शन सीन करणे कठीण झाले आहे- सलमान खान
* रजनीकांतचा नवा चित्रपट ‘दरबार’, पोस्टर प्रकाशित


Comments

Top