HOME   महत्वाच्या घडामोडी

आज अयोध्येचा निकाल, सरकार स्थपनेचा तिढा कायम, आमदार सुरक्षित ठिकाणी, आयाराम अस्वस्थ, तीन खान एकत्र.....०९ नोव्हेंबर २०१९

आज अयोध्येचा निकाल, सरकार स्थपनेचा तिढा कायम, आमदार सुरक्षित ठिकाणी, आयाराम अस्वस्थ, तीन खान एकत्र.....०९ नोव्हेंबर २०१९

* शेतकर्‍यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आज करणार पंतप्रधानांचा सत्कार
* लातुरात सोयाबीन पोचले ३९२५ रुपयांवर
* १९ जानेवारीला शिक्षक पात्रता परिक्षा
* लातूर जिल्ह्यात रबी पेरणीसाठी मोफत बियाणे देण्याची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
* आज अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल, साडेदहा वाजता होणार सुरुवात, देशभर कडेकोट सुरक्षा
* अयोध्येवर सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेर्‍यांचे लक्ष, मोठा बंदोबस्त तैनात, जवळपास सगळ्या सुरक्षा यंत्रणा सेवेत
* शांतता बाळगण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
* अयोध्या निकाल: मुंबईत कडेकोट बंदोबस्त, ५० हजार पोलीस, निमलष्करी दलाचे जवान तैनात
* शारद पवारांच्या घरी झाली कॉंग्रेस नेत्यांची बैठक, संजय राऊतही संपर्कात
* भाजपनं मुख्यमंत्रीपद देण्याचं लेखी पत्र द्यावं, संजय राऊत भूमिकेवर ठाम
* गोड बोलून शिवसेना संपवण्याचा भाजपाचा डाव, उद्धव ठाकरे यांचा आरोप
* शिवसेनेचे आमदार सुरक्षित ठिकाणी रवाना
* भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष, राज्यपाल त्यांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण का देत नाहीत?- शरद पवार
* कोणतीही अनैसर्गिक आघाडी टिकत नसते, भाजप-सेनेनं एकत्र यायलाच हवं- नितीन गडकरी
* छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी सोनी टीव्हीने मागितली पत्रकाद्वारे माफी
* सत्तेच्या खेळामुळे भाजपात आलेले आयाराम अस्वस्थ, भाजपाविना सरकार आले तर घर का ना घाटका!
* उत्तर भारतात थंडीची लाट, अनेक ठिकाणी बर्फवृष्टी
* व्यवसायांच्या वाढीसाठी आता व्हाटसॅपवर कॅटलॉगची सोय येणार
* कर्तापूर कॅरिडॉरला मनमोहनसिंग भेट देणार, पाकिस्तानकडे केली झेड सुरक्षेची मागणी
* शाहरुख खान, आमीर खान आणि सलमान खान लवकरच एका चित्रपटात एकत्र येणार


Comments

Top