HOME   महत्वाच्या घडामोडी

रस्त्यांना पुन्हा मुरुमाचा आधार, आता बुलबुल वादळ, पदवीधर कमी झाले? मध्यरात्री आमदारांची भेट, न्यायालय सर्वोच्च पण अचूक नाही.....१० नोव्हेंबर २०१९

रस्त्यांना पुन्हा मुरुमाचा आधार, आता बुलबुल वादळ, पदवीधर कमी झाले? मध्यरात्री आमदारांची भेट, न्यायालय सर्वोच्च पण अचूक नाही.....१० नोव्हेंबर २०१९

* अयोध्या प्रकरणी आलेल्या न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान, स्वागत आणि आदर करुया- आ. अमित देशमुख
* कोल्ड मिक्सने लातुरातील खड्डे बुजवावेत असा आदेश पालकमंत्र्यांनी देऊनही मुरुम भरणे सुरु
* लातूर महानगरपालिकेने केली २६०८ फेरीवाल्यांची यादी निश्चित, धोरण लवकरच राबवणार
* औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात फक्त ३४ हजार २५७ मतदारांची नोंदणी
* २०१४ मध्ये होते ५१ हजार ७१३ मतदार!
* लातूर जिल्ह्यात ०३ लाख ६२ हजार हेक्टर्स जमीनीचे झाले पंचनामे
* राज्यपालांनी भाजपाला दिले सत्ता स्थापनेचे निमंत्रण
* भाजपाकडे बहुमत आहे की नाही याची खात्री राज्यपालांनी खात्री करायला हवी- नवाब मलिक
* आदित्य ठाकरे यांनी घेतली सेना आमदारांची हॉटेल रिट्रीटमध्ये मध्यरात्री भेट, तिथेच केला मुक्काम
* भाजपा सरकार कोसळल्यावर पर्यायांचा विचार करु- राष्ट्रवादी
* कॉंग्रेसचे आमदार राजस्थानात, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाणही रवाना
* १२ नोव्हेंबरला शरद पवार यांनी बोलावली राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक
* उद्धव ठाकरे चोवीस तारखेला अयोध्या भेटीवर जाण्याची शक्यता
* अयोध्या प्रकरणाचा निकाल तबल एक हजार ४५ पानांचा
* अयोध्या प्रकरणाचा निकाल, इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी लागेल- उद्धव ठाकरे
* अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जळगावात निघाली सर्वधर्मियांची शांतता रॅली
* अयोध्या निकालाचा सर्वांनी आदर आणि मान ठेवला पाहिजे- अण्णा हजारे
* अयोध्या निकालानंतर अमित शाह यांनी घेतली भाजपा प्रवक्त्यांची बैठक
* सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे पण अचूक नाही, पाच एकरांची भीक नको- असदुद्दीन ओवेसी
* अडीच वर्षात उभे राहू शकते अयोध्येत राम मंदीर- वास्तूविशारद चंद्रकांत सोमपुरा
* बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणाचाही निकाल लवकरच लागणार
* आता बुलबुल वादळ! ओडिशा किनारपट्टीला धडकले
* मुंबईत नोव्हेंबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसाने ३० वर्षांचा विक्रम मोडला
* लवकरच येणार हृतिक रोशनचा ‘क्रिश फोर’
* अनिल अंबानी यांवर तीन चिनी बॅंकांनी केला ४८ अब्जांचा दावा
* फक्त अ‍ॅडमिनच पोस्ट्स टाकेल! अयोध्या पार्श्वभूमीवर अनेक अ‍ॅडमिन्सनी ठोकले ग्रुप्सना टाळे


Comments

Top