HOME   महत्वाच्या घडामोडी

मशीद नको शाळा बांधा, राऊत भेटणार पवारांना, रामनवमीदिनी शिलान्यास, अक्षयकुमार जखमी, इराणमध्ये नवा तेलसाठा.....११ नोव्हेंबर २०१९

मशीद नको शाळा बांधा, राऊत भेटणार पवारांना, रामनवमीदिनी शिलान्यास, अक्षयकुमार जखमी, इराणमध्ये नवा तेलसाठा.....११ नोव्हेंबर २०१९

* लातुरात फेरीवाल्यांच्या यादीस मनपाने दिली मंजुरी
* शिवसेनेला पाठिंबा देऊन कॉंग्रेसची सत्तेत सहभागी होण्यास आमदार उत्सुक
* शिवसेना आमदारांची आज मुंबईत बैठक
* ‘वर्षा’ बंगल्यावर भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीचे आयोजन
* सत्ता स्थापनेच्या हालचाली वाढल्या, संजय राऊत भेटणार शरद पवार यांना
* उद्धव ठाकरे आणि शरद पवारही लवकरच भेटणार
* आचारसंहिता कठोरपणे राबवणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टीएन शेषन यांचं निधन
* नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून सत्ता स्थापनेचा निर्णय रद्द केला- भाजपा
* शिवसेनेने जनादेशाचा अवमान केला- चंद्रकांत पाटील
* शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडावे, भाजपाशी नाते ठेऊ नये- राष्ट्रवादी नेते नवाब मलिक
* न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत रामलल्लांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी
* रामनवमीच्या दिवशी पंतप्रधान अयोध्येत राम मंदिरासाठी शिलान्यास करणार
* बुलबुल वादळाने ओडिशात दोन तर पश्चिम बंगालमध्ये घेतले सात बळी
* इराणमध्ये सापडला तेलाचा मोठा साठा
* ‘पानिपत’ चित्रपटाचा रिलीज, राज ठाकरे यांनीही पाहिला
* सूर्यवंशी चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी अभिनेता अक्षयकुमार जखमी
* महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांत श्वसनरोग्यांच्या संख्येत वाढ
* अयोध्येत मिळालेल्या पाच एकर जागेवर मशीद बांधायची की नाही याचा निर्णय वक्फ बोर्ड २६ नोव्हेंबरला घेणार
* अयोध्येतील त्या पाच एकर जागेवर शाळा बांधा, ही गरज मोठी- सलमान खानचे वडील सलीम खान
* अयोध्या प्रकरणाचा निकाल देणार्‍या पाच न्यायाधिशांच्या संरक्षणात वाढ


Comments

Top