HOME   महत्वाच्या घडामोडी

नवा महापौर ओबीसी, सगळे आमदार हतबल, मध्यावधी होणार नाही, कर्नाटकातील १७ आमदार अपात्र, आमदार फोडणार्‍यांचे डोके फुटेल!.....१४ नोव्हेंबर १९

नवा महापौर ओबीसी, सगळे आमदार हतबल, मध्यावधी होणार नाही, कर्नाटकातील १७ आमदार अपात्र, आमदार फोडणार्‍यांचे डोके फुटेल!.....१४ नोव्हेंबर १९

* लातुरचे महापौरपद इतर मागासवर्गीयासाठी आरक्षित
* फडणवीस मुख्यमंत्री होणार हे प्रचारादरम्यान सांगितले तेव्हा शिवसेनेने विरोध का केला नाही? अमित शाह यांचा सवाल
* राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या बैठकीनंतर शिवसेनेशी चर्चा करणार
* शिवसेनेचा आमदार फोडण्याचा प्रयत्न करणार्‍याचे डोके फुटेल- आ. दिलीप लांडे
* सत्तापेचामुळे आमदार हतबल, निधी नाही, काम नाही, ओळखपत्रही नाही!
* राज्यपालांच्या विरोधात दाखल केलेली याचिका शिवसेनेने घेतली मागे
* उध्दव ठाकरे आणि कॉंग्रेस नेत्यांमध्ये झाली बैठक
* चिंता करु नका, मध्यावधी निवडणुका होणार नाहीत- शरद पवार
* ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्स यांनी दिली भारतीय हवामान खात्याच्या कार्यालयाला भेट
* कर्नाटकच्या पक्ष बदलणार्‍या १७ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठरवला योग्य
* या १७ आमदारांना निवडणूक लढवण्याची परवानगी
* शिवसेनेचा ५०-५० फॉर्म्युला अमान्य- अमित शाह
* शिवसेना, राष्ट्रवादीला अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद, कॉंग्रेस पाच वर्षे उप मुख्यमंत्रीपद सांभाळणार असल्याची चर्चा
* शिवसेना आमदारांना मालाडच्या हॉटेलातून बाहेर पडण्यास उद्धव ठाकरे यांनी दिली परवानगी
* कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची झाली बैठक, तपशील गुलदस्त्यात
* महाराष्ट्राने महायुतीला जनादेश दिला पण मित्रपक्षांनी त्याचा अनादर केला- रावसाहेब दानवे
* उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत
* शिवसेनेकडे बहुमत असेल तर सरकार स्थापन करुन दाखवावे- अमित शाह
* कुलभूषण जाधव यांच्यासाठी पाकिस्तान करणार लष्करी कायद्यात बदल
* भारत-बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्याला आज सुरुवात


Comments

Top