HOME   महत्वाच्या घडामोडी

कॉंग्रेसचाही होऊ शकतो महापौर, सोयाबीन जाळून निषेध, सरन्यायाधीश होणार निवृत्त, आज पवार-गांधी भेट, भाजपापेक्षा शिवसेना मऊ.....१८ नोव्हेंबर २०१९

कॉंग्रेसचाही होऊ शकतो महापौर, सोयाबीन जाळून निषेध, सरन्यायाधीश होणार निवृत्त, आज पवार-गांधी भेट, भाजपापेक्षा शिवसेना मऊ.....१८ नोव्हेंबर २०१९

* लातुरच्या महापौराची २२ तारखेला निवड, आजपासून अर्जांची विक्री
* राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या फॉर्मुल्यामुळे लातुरात महापौरपदासाठी कॉंग्रेसही उत्सुक!
* महापौर निवडीसाठी लातुरात खरेदी-विक्रीची शक्यता
* महापौरपदासाठी शैलेश गोजमगुंडे, शैलेश स्वामी, व्यंकट वाघमारे, विक्रांत गोजमगुंडे शर्यतीत
* शेतकर्‍यांना अल्प मदत जाहीर, राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी कोळपा येथे सोयाबीन जाळून केला निषेध
* दोन हजार किलोमीटरवर मारा करणार्‍या अग्नी क्षेपणास्त्राची चाचणी ओडेशात यशस्वी
* लता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
* इराणमध्ये इंधनाच्या दरात पन्नास टक्क्यांनी वाढ
* सरन्यायाधीश रंजन गोगोई आज होणार निवृत्त, न्यायमूर्ती शरद बोबडे होणार पदारुढ
* निवृत्त होण्यापूर्वी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन
* आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, महत्वाच्या २७ विधेयकांवर होऊ शकतो निर्णय
* सत्तापेच: शरद पवार आज घेणार सोनिया गांधी यांची भेट
* काल पवारांनी पुण्यात घेतली राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक
* बाळासाहेबांना अभिवादन करताना देवेंद्र फडणवीस यांच्या समोर शिवसैनिकांनी केली घोषणाबाजी
* शिवसेना एनडीएतून बाहेर पडली, भाजपाकडून घोषणा
* एनडीए कुणाच्या मालकीची नाही, बाळासाहेब संस्थापक होते, आम्हाला बाहेर काढणारे कोण? संजय राऊत यांचा सवाल
* संजय राऊत आज दिल्लीत; कॉंग्रेस नेते अहमद पटेल आणि मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेण्याची शक्यता
* भाजपापेक्षा शिवसेना म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ- जयंत पाटील
* भाजपाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात- जयंत पाटील
* पाऊस थांबला हे बरं झालं, जाताना देवेंद्रंना घेऊन गेला हेही बरं झालं, राष्ट्रवादीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची खिल्ली
* मुंबईच्या महापौरपदासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
* महापौरपदासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस शिवसेना उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता
* अयोध्या निकालाच्या विरोधात मुस्लीम लॉ बोर्डाची याचिका
* अयोध्या खटल्यातील न्यायमूर्ती अब्दुल नजीर आणि त्यांच्या कुटुंबियांना झेड दर्जाची सुरक्षा प्रदान
* आजपासून ‘रामायण’ एक्स्प्रेस होणार सुरु, महत्वाच्या तीर्थक्षेत्री * जाणार
* शबरीमला मंदिराचे दरवाजे दोन महिन्यांसाठी खुले
* डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला जोडले नवे डबे
* नाशिकमध्ये घुमर नृत्यात पाच हजार महिलांनी घेतला सहभाग
* राज्यात भाजपचेच सरकार स्थापन होणार; केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दावा
* पुढच्या मार्चपर्यंत एअर इंडीया आणि भारत पेट्रोलियम विकणार, अर्थमंत्र्यांची घोषणा


Comments

Top