HOME   महत्वाच्या घडामोडी

संजय बनसोडेंचे जोरदार स्वागत, वाघाची झाली शेळी! फडणवीस खोटारडे? मनसे बदलणार झेंडा, राज्यमंत्री सत्तार आजही भेटणार मुख्यमंत्र्यांना, भाजपाचे मंत्री होम टू होम.....०६ डिसेंबर २०२०

संजय बनसोडेंचे जोरदार स्वागत, वाघाची झाली शेळी! फडणवीस खोटारडे? मनसे बदलणार झेंडा, राज्यमंत्री सत्तार आजही भेटणार मुख्यमंत्र्यांना, भाजपाचे मंत्री होम टू होम.....०६ डिसेंबर २०२०

* आज दर्पण दिन, डॉ. मिलींद पोतदार यांच्या लातुरच्या सावली रुग्णालयात मानसिक ताणतणावावर व्याख्यान
* लातुरच्या मांजरा आणि तावरजा नदीतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अवैध उपसा सुरु
* राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे लातुरात झाले भव्य स्वागत
* लातूर जिल्हा परिषद अध्यक्षांची आणि उपाध्यक्षांची आज निवड
* भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी लातुरच्या कार्निवल हॉटेलात घेतली भाजपाच्या जिल्हा परिषदेतील सदस्यांची बैठक
* भाजपाचा एकही जिल्हा परिषद फुटू नये याची घेतली खबरदारी
* शिवसेनेच्या वाघाची आता शेळी झाली आहे, रावसाहेब दानवे यांनी लगावला लातुरात टोला
* शरद पवार यांच्यामुळेच आमदार आणि मंत्री झालो- संजय बनसोडे
* राज्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर संजय बनसोडे आले पहिल्यांदाच लातुरात रेल्वे स्थानकात झाले जोरदार स्वागत
* मंत्री संजय बनसोडे यांनी लातुरातील महापुरुषांच्या सर्वच पुतळ्यांना केले अभिवादन, लोकनेते विलासरावांच्या स्मृतीस्थळालाही केले वंदन
* सुधारीत नागरिकत्व कायद्याला पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपाची होम टू होम मोहिम सुरु; अमित शाह, राजनाथसिंह, सीतारामन झाले सहभागी
* देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा खोटारडा माणूस पाहिला नाही- अनिल गोटे
* महाराष्ट्रात सुधारित नागरिकत्व कायदा लागू होऊ देणार नाही- मंत्री वर्षा गायकवाड
* मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर गेलेल्या शेतकरी वडील आणि मुलीला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नंतर दिले सोडून
* पाकिस्तानात शीख तरुणाची हत्या, अल्पसंख्याकांवरील हल्ल्यात झाली वाढ
* बॉलीवूडमधील गाण्यांचा दर्जा घसरला म्हणून आपण दूर- आशा भोसले
* मनसेचा झेंडा होणार भगवा, झेंड्य़ावर असणार शिवमुद्रा
* राज्यमंत्री अब्दुल सत्तार आजही घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, काल झाली होती २० मिनिटे चर्चा
* मी राजीनामा दिला नाही, त्या केवळ अफवा- अब्दुल सत्तार
* राहूल आणि प्रियंका गांधींनी दंगली घडवल्या, अमित शाह यांचा आरोप
* विरोधी पक्षाच्या नेत्यांना मानसोपचारांच्या उपचारांची गरज- संजय सावंत
* कोल्हापुरातील मटनाची दुकाने एक दिवस राहिली बंद, दीड कोटीची उलाढाल ठप्प
* कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत मंत्रीपदावरुन अस्वस्थता
* 'क्रेनला उलटे टांगून तुझी दाढी करेन', भाजप खासदार धरमपुरी अरविंद यांचा असदुद्दीन ओवेसींना इशारा
* मंत्रालयातून जनतेची कामे होणार नसतील, तर मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून लोकांना न्याय मिळवून देऊ- राज्यमंत्री बच्चू कडू
* जेएनयू विद्यसपिठाच्या हॉस्टेलमध्ये अज्ञातांकडून हल्ला, २५ विद्यार्थी जखमी


Comments

Top