HOME   महत्वाच्या घडामोडी

बोरवटी गाव रस्त्यावर, खैरे-सत्तारात दिलजमाई, पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका, मनसे आता भगव्या वाटेवर, पेट्रोल-डिझेल महागले.....०७ जानेवारी २०२०

बोरवटी गाव रस्त्यावर, खैरे-सत्तारात दिलजमाई, पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका, मनसे आता भगव्या वाटेवर, पेट्रोल-डिझेल महागले.....०७ जानेवारी २०२०

* बोरवटीच्या माहेरवाशिणीचा खून, आख्खे गाव आले रस्त्यावर, पोलिसांची मुजोरी, बराच काळ वाहतूक ठप्प
* सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा द्यावा या मागणीसाठी लातुरात अंगणवाडी सेविकांनी काढला मोर्चा
* एमआयटीच्या वतीने लातुरात आजपासून दोन दिवस दयानंद सभागृहात विज्ञान तंत्रज्ञान महोत्सव
* केंद्राच्या धर्तीवर राज्यातही सात नवी खाती उघडण्याचे प्रयत्न, नाराजांसाठी नवी शक्कल
* दिल्लीच्या जेएनयू विद्यापिठातील विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा बॉलिवूड कलावंतांकडून निषेध
* तोंड बांधून विद्यसर्थ्यांवर हल्ला करणारे डरपोक होते- उद्धव ठाकरे
* जेएनयू प्रकरणी गेट वे ऑफ इंडियाजवळ ३२ तासांपासून आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांना पोलिसांनी हलवले आझाद मैदानावर
* महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लागू देणार नाही- उद्धव ठाकरे
* चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार यांच्यात झाली दिलजमाई, वाद मिटल्याची घोषणा
* राज्यात पाच जिल्हा परिषदांसाठी आज मतदान
* जालना जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडणुकीतून भाजपची माघार, महाविकास आघाडीचा झेंडा
* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील उद्योजकांशी संवाद साधणार
* भाजप विरोधी नेत्यांची संजय राऊत घेणार भेटी
* ठाण्याच्या दिवातील ३०० अनधिकृत घरे पाडण्यात आली
* वसई किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ भीषण आग
* तीस टक्क्यांपेक्षा कमी प्रवाशी असणार्‍या एसटीच्या फेर्‍या बंद करणार, तोटा कमी करण्याचे प्रयत्न
* मागच्या वर्षी फक्त एकाच नॅनो कारची विक्री, वर्षभरात उत्पादनच झाले नाही
* औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात इंजेक्शन घेऊन डॉक्टरची आत्महत्या
* पेट्रोलच्या दरात १५ तर डिझेलच्या दरात १७ पैशांनी वाढ
* केंद्राप्रमाणे राज्यातही पाच दिवसांचा आठवडा- करा कर्मचाऱ्यांची मागणी
* आठ जानेवारीला संपावर जाण्याचा राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा इशारा
* शिवसेना धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत गेल्याने मनसे हाती घेणार हिंदुत्वाचा झेंडा
* राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मातोश्रीवर घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट
* उद्योग क्षेत्राची प्रगती आणि रोजगार निर्मिती वाढावी यासाठी पंतप्रधानांनी साधला उद्योगपतींशी संवाद
* दिल्ली विधानसभेची निवडणूक जाहीर, ०८ फेब्रुवारीला मतदान
* नागरिकत्व कायद्याच्या दुरुस्तीच्या समर्थनार्थ देशभरातून आले ५२ लाख फोन


Comments

Top