HOME   महत्वाच्या घडामोडी

अमित देशमुख लातुरचे पालकमंत्री

मंत्रीपदावरुन धुसफूस पण पालकमंत्रीवरुन अद्याप वाद नाही

अमित देशमुख लातुरचे पालकमंत्री

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. काल रात्री उशिरा या सगळ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. मंत्री आणि खातेवाटपावरुन धुसफूस चालू असली तरी पालकमंत्री नेमण्यावरुन अद्याप विरोधाचा सूर बाहेर आलेला नाही. पालकमंत्री आणि त्यांचे जिल्हे याप्रमाणे:
चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार, नागपूर- डॉ. नितीन राऊत,अमरावती- ॲड. यशोमती ठाकूर, गोंदिया- अनिल देशमुख, हिंगोली- वर्षा गायकवाड, बीड- धनंजय मुंडे, नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण, उस्मानाबाद- शंकरराव गडाख, लातूर- अमित विलासराव देशमुख, सोलापूर- दिलीप वळसे-पाटील, कोल्हापूर- बाळासाहेब थोरात, औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई, जालना- राजेश अंकुशराव टोपे, परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक, नंदुरबार: ॲड. के.सी. पाडवी, जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील, अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ, सातारा- बाळासाहेब पाटील, सांगली- जयंत पाटील सिंधुदूर्गः उदय सामंत, पालघरः दादाजी दगडू भुसे, नाशिकः छगन चंद्रकांत भुजबळ, धुळेः अब्दुल नबी सत्तार, मुंबई शहरः अस्लम रमजान अली शेख, रायगडः आदिती सुनिल तटकरे, रत्नागिरीः ॲड. अनिल दत्तात्रय परब, अजित पवार पुणे, आदित्य ठाकरे मुंबई उपनगर, एकनाथ शिंदे गडचिरोली तर अशोक चव्हाण नांदेडचे पालकमंत्री


Comments

Top