HOME   महत्वाच्या घडामोडी

लातुरच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे विकास वाघमारे विजयी, मुख्यमंत्री मराठवाड्यात, आज छपाक-तान्हाजी-धुरळा, छायाकल्प चंद्रग्रहण.....१० जानेवारी २०२०

लातुरच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे विकास वाघमारे विजयी, मुख्यमंत्री मराठवाड्यात, आज छपाक-तान्हाजी-धुरळा, छायाकल्प चंद्रग्रहण.....१० जानेवारी २०२०

* आज लातुरच्या बाजारात सोयाबीन ४३६५ तर मूग पोचला ६९५० रुपयांवर
* लातुरच्या प्रभाग ११ अच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे विकास वाघमारे ७२६ मतांनी विजयी
* वाघमारेंना मिळाली २४७१ मते, भाजपाचे गायकवाड निखिलांना १७४५ तर वंचितच्या सुजातांना मिळाली ८८१
* विजय वडेट्टीवारांची नाराजी संपली, मदत आणि पुनर्वसन खात्याचा कार्यभार आजच स्विकारणार
* लातूर जिल्हा परिषदेच्या शाळात मोबाईल वापरावर बंदी घाला, नूतन जिल्हा परिषद अध्यक्षांची सूचना
* लातूर जिल्ह्यातील २० हजार २८८ शेतकर्‍यांनी आधार केले बॅंक खात्यांशी लिंक
* लातूर मनपाच्या अवाजवी करवसुलीला बागरिक हक्क कृती समितीचा विरोध
* म्होरक्या चित्रपटाचे कलावंत आज लातुरातील विद्यार्थ्यांशी साधणार संवाद
* उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या मराठवाडा दोर्‍यावर
* आज मुख्यमंत्री ठाकरे घेणार लातूर, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यांचा आढावा
* दाऊद इब्राहीमचा हस्तक एजाज लकडावालाला पाटणा विमानतळावर ३० वर्षांनी अटक
* लकडवालावर २५ खुनाचे आरोप, ऐंशी प्रकरणे खंडणीची
* नवे पुरावे देऊन चौकशीची मागणी केल्यास न्या. ब्रिजमोहन लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची होणार पुन्हा चौकशी
* आज छपाक, तान्हाजी आणि धुरळा चित्रपट झळकणार
* देशात १२५ कोटी लोकांकडे आधार कार्डे
* एक फेब्रुवारीला सदर होणार केंद्रीय अर्थसंकल्प
* आधार कार्डांचा गैरवापर करुन आर्थिक लुबाडणार्‍या अनेक टोळ्या कार्यरत
* डीआयजी निशिकांत मोरेला केव्हाही हुऊ शकते अटक, मोरे फरार
* गौरी लंकेश हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला अटक
* माणिकराव ठाकरे यांनी घेतली विजय वडेट्टीवारांची भेट, मनधरणीचे प्रयत्न
* आज ‘छायाकल्प’ चंद्रग्रहणाचे दर्शन
* २०१८ वर्षात देशभरात १०३४९ शेतकर्‍यांनी केल्या आत्महत्या
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारंघाला आज प्रियंका गांधी देणार भेट
* सिंदूर लेपनसाठी सिधीविनायक मंदीर राहणार चार दिवस बंद
* आजपासून उस्मानाबादेत ९३ व्या मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात
* साहित्य संमेलनाचे उद्घाटक नाधो महानोरांना ब्राम्हण महासंघाचे धमकीपत्र, संमेलनाला न जाण्याचा इशारा
* सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर घेतले भगवानबाबांचे दर्शन
* मनसेची कार्यपद्धती बदलली तर भाजपासोबत युती होऊ शकते- देवेंद्र फडणवीस
* निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी विनय शर्माने सर्वोच्च न्यायालयाकडे केली फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची केली मागणी
* शेतकर्‍यांना दोन लाखांची कर्जमाफी: योजनेच्या अमलबजावणीसाठी सहकार अधिकार्‍यांना प्रशिक्षण
* पुरात कोल्हापुरात पडझड झालेल्या घरांसाठी भरपाई म्हणून प्रशासनाने केले ७० कोटी रुपये
* उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अशासकीय सदस्य नियुक्त समित्या होणार रद्द
* जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद घटली


Comments

Top