• 19 of April 2018, at 5.16 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
news image सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 news image हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर news image अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 news image लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 news image ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501

HOME   महत्वाच्या घडामोडी

प्राध्यापक भरतीसाठी आत्महत्या, कॉंग्रेसचा घंटानाद, शिवसेना वागते सवतीसारखी, उद्या पंतप्रधानांचे उपोषण, नेभळट सरकार-पुचाट कायदा......११ एप्रिल १८

प्राध्यापक भरतीसाठी आत्महत्या, कॉंग्रेसचा घंटानाद, शिवसेना वागते सवतीसारखी, उद्या पंतप्रधानांचे उपोषण, नेभळट सरकार-पुचाट कायदा......११ एप्रिल १८

* आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती, लातुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
* हरभरा उत्पादक अडचणीत, ऑनलाईनकडे पाठ, कमी भावात रोखीने विक्री
* विधानसभेची अंदाज समिती आजपासून लातूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर
* दहावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात शिवसेना आणि भाजपाचे कौतुक
* लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग चौथ्या दिवशी पाऊस
* लातुरच्या गंजगोलाईत फळाचे गाडे लावण्यावरुन काल झाला संघर्ष, दोन गटात तणाव, पोलिसांचा यशस्वी हस्तक्षेप
* पोलिसांनी गंजगोलाईत केले मॉक ड्रील
* प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवा अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या, पीएचडी-सेट नेटधारकांचे आ. काळेंना निवेदन
* प्रकृती अस्वास्थ्यामुळे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे उद्याचे लातुरातील व्याख्यान रद्द
* लातूर मनपाच्या करवाढीविरुद्ध लातूर जिल्हा कॉंग्रेस आज हनुमान चौकात करणार घंटानाद रॅली
* रेणा साखर कारखान्यावर आज १२ मेगावॅट सह वीज निर्मिती प्रकल्पाचे पूजन
* आम्ही राणेंना का घेतलं याचं चिंतन शिवसेनेनं करावं- मुख्यमंत्री
* तुम्ही आमच्याशी नीट वागला असता तर आम्ही राणेंना कशाला जवळ केलं असतं- मुख्यमंत्री
* पुढच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती झाली तर भाजपात राहणार नाही- नारायण राणे
* नगरचा झालाय नरक, वाल्याचा वाल्मिकी करण्याचा भाजपने उघडलाय नवा उद्योग- उद्ध्व ठाकरे
* विरोधकांनी संसदेचे मोलाचे दिवस वाया घालवल्या प्रकरणी उद्या पंतप्रधान करणार निषेध उपोषण
* चालू गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाचे प्रतिटन ५५ रुपये अनुदान देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, अनुदान जमा होणार बँक खात्यावर
* महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे डॉ. प्रताप पाटील तर उपाध्यक्षपदी सिद्धार्थ पथाडे बिनविरोध
* नगरचे हत्याकांड हा महाराष्ट्राला लागलेला डाग, खुनाचे शिंतोडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या अंगावर उडाले- सामनातून सेनेची टिका
* शिवसेना पदाधिकार्‍यांचे सांडलेले रक्त वाया जाणार नाही- उद्धव ठाकरे यांचा सामनातून इशारा
* नेभळट सरकार व पुचाट कायदा काय करतोय ते पाहू, नाहीतर नगरच्या पर्यटन केंद्रात उदयास आलेल्या नव्या ‘संतां’ची पूजा वाघांचे पंजे करतील- उद्धव ठाकरे
* राज्यात खाजगी शाळांमध्ये आरटीई प्रवेशाला १३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
* देशात तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी एकत्र आले, तर हिंदुत्वाच्या विचारांवर चालणाऱ्या सेना -भाजपला एकत्र यावेच लागेल- मुख्यमंत्री
* कोल्हापूर- मुंबई दरम्यान २२ एप्रिलला विमानसेवा होणार सुरु, कोल्हापूरहून झेपावणार दुपारी तीन वाजता
* भाजपची वाटचाल भरतीकडून ओहोटीकडे, पोटनिवडणुकीतून सिद्ध होत असल्याचा अजित पवार यांचा दावा
* शिवसैनिकांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले असतील तर ते तपासून मागे घेतले जातील- मुख्यमंत्री
* मुंबई विद्यापीठाच्या आर्किटेक्चर शाखेतील एका प्रश्नपत्रिकेत ६५ टक्के प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील आल्याची विद्यार्थ्यांची तक्रार
* मुंबईतील ९८ टक्के बर्फाचे नमुने दूषित असल्याचे तपासणीतून आले समोर
* शुल्क पूर्ण न भरल्याचे कारण देऊन प्रवेश नाकारणाऱ्या खाजगी शाळांची मान्यता काढणार
* मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन मूल्यांकनाच्या निर्णयाच्या विरोधात लॉ शाखेचा विद्यार्थी आत्मदहनाच्या तयारीत
* शाळांच्या सुट्ट्या, एप्रिल अखेरीस आलेल्या सलग चार दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कोकण, गोव्यासाठी जाणाऱ्या एक्स्प्रेस फुल्ल
* केंद्र सरकार लोकांना एकत्र करण्याचे काम करीत असताना विरोधक समाज तोडण्याचे काम करीत आहेत- नरेंद्र मोदी
* गरिबांच्या विकासासाठी सरकारचे प्रयत्न, त्यात अडथळे आणण्यासाठी संसद ते रस्त्यावर विरोधकांकडून अडथळे आणले जात आहेत- पंतप्रधान
* माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावरील बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा मागे घेण्याचा निर्णय
* एनडीएच्या प्रमुखपदाचा एअर मार्शल आय. पी. विपीन यांनी स्विकारला पदभार
* चालू आर्थिक वर्षात खाजगी क्षेत्रातील नोकरदारांना ०९.६ टक्के पगारवाढ मिळण्याचे संकेत- एका संस्थेचे सर्वेक्षण
* अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्याच्या कारने उडविले दुचाकीस्वारास, अधिकाऱ्याला अमेरिकेमध्ये परतण्यास बंदी घाला- पाक पोलिस


Comments

Top