logo
news image हिंमत असेल तर धनंजय मुंडे यांनी बीड लोकसभा लढवावी- पंकजा मुंडे news image गरिबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देऊ- राहूल गांधी news image गरिबांच्या खात्यावर थेट पैसे जमा करु- राहूल गांधी news image पाकिस्ताननं भारतातले ४० अतिरेकी मारले- थोर विचारवंत रावसाहेब दानवे news image औरंगाबादेतून इम्तियाज जलील यांना उमेदवारी- वंचित विकास आघाडीची घोषणा news image उर्मिला मातोंडकर भाजपात, निवडणूकही लढवणार news image रणजितसिंह निंबाळकर भाजपात news image लोकसभा निवडणुकीच्या नाकाबंदीत विदर्भात ८० लाख जप्त news image यंदाच्या पावसाळ्यात अल निनो घालणार खोडा- हवामान खाते

HOME   काल, आज आणि उद्या

घंटेशिवाय ‘हातात’ काय? डॉलरची रद्दी, पंतप्रधानांचं उपोषण, अवकाळीचा पुन्हा गोंधळ, दहावीचे पुस्तक भाजपाचा जाहीरनामा?.........

घंटेशिवाय ‘हातात’ काय? डॉलरची रद्दी, पंतप्रधानांचं उपोषण, अवकाळीचा पुन्हा गोंधळ, दहावीचे पुस्तक भाजपाचा जाहीरनामा?.........

* श्रीहरीकोटा येथून आज सकाळी इस्रोने केले नेव्हीगेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
* हुबळीत ११ ते ०२ या वेळेत होणार्‍या उपोषणात अमित शाह होणार सहभागी
* यवतमाळ येथे शेतकरी शंकर चायरे यांची आत्महत्या, नरेंद्र मोदींवर गुन्हा दाखल करा, तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही, कुटुंबाचा निर्धार
* लातुरात खा. सुनील गायकवाड यांनी केलं उपोषण
* मुंबईच्या उपोषणात अनंत गितेंचा सहभाग, ठाकरेंच्या आदेशानंतर उपोषण स्थळ सोडले
* महागाई आणि मनपाच्या धोरणांच्या विरोधात कॉंग्रेसने हनुमान चौकात केला घंटानाद
* रेणापूर, चाकूर, उदगीर, जळकोट आणि लातूर तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस, झाडे कोसळली, पिके आडवी
* रेणा साखर कारखान्यावर करणार सोलार वीज निर्मिती
* विरोधी पक्षाच्या भूमिकेबाबत आज पंतप्रधान आणि भाजपाचा उपवास, लातुरात खा. सुनील गायकवाडांचे उपोषण
* लवकरच शेतकर्‍यांचे वीज बीलही होणार सशर्त माफ
* संसदेला ओलिस ठेवणार्‍या, सत्तेच्या भुकेपोटी देशाचा विकास होऊ न देणार्‍या मूठभर लोकांची मानसिकता उघड करण्यासाठी उपवास- पंतप्रधान
* राजकारणी लोक एकमेकांना राजकीय शह देण्यासाठी उपोषणाचा वापर करत आहेत, ही उपोषणाच्या पवित्र मार्गाची चेष्टा- अण्णा हजारे
* दिल्लीत पहाटेच्या सुमारास पावसाची हजेरी
* यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी शंकर चायरे यांची आत्महत्या, मुख्यमंत्री भेटल्याशिवाय शव स्वीकारणार नाही- चायरे यांची मुलगी
* मुख्यमंत्री आज यवतमाळच्या दौऱ्यावर, चायरे कुटुंबीय कार्यक्रमस्थळी येऊ नये म्हणून तयारी, शेतकरी न्याय हक्क आंदोलन समिती नेते स्थानबद्ध
* पूंछ येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चमकमकीत औरंगाबाद जिल्ह्यातील जवान शहीद
* काँग्रेसचे उपोषणास्त्र फसल्यावर भाजपाचा एक दिवसाचा उपवास म्हणजे मोर आणि लांडोर यांची स्पर्धा- उद्धव ठाकरे
* देशातील मोठ्या वर्गाचे हाल आणि उपासमार थांबत नसल्यामुळे आत्महत्या वाढल्या, उपवास नाट्याने काय साध्य होणार?- सामनाचा अग्रलेख
* प्लास्टिक आणि थर्माकोल उत्पादकांचे म्हणणे ऐकून निर्णयाचा पुनर्विचार करण्याची सरकारची तयारी
* बंदी कायम ठेवायची की स्थगिती द्यायची याचा निर्णय न्यायालय आज देण्याची शक्यता
* आर्मस्ट्राँग कंपनीकडे बँकेची ०४ कोटी ३४ लाखाची कर्ज थकबाकी, वसुलीसाठी भुजबळ कुटुंबियांचा भूखंड ताब्यात
* विद्यापीठांवरील परीक्षांचे ओझे कमी करणे, सरकारचा वेतनाचा भार हलका करण्यासाठी राज्यातील महाविद्यालयांना मिळणार वित्तीय स्वायत्तता
* सिल्लोडमध्ये तीन शाळकरी मुलांचा तळ्यात बुडून मृत्यू
* भाजपने उत्तर प्रदेशात नावावरून बाबासाहेबांचा अपमान केला, काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू- आनंदराज आंबेडकर
* मुंबई विद्यापीठ वकिलांची नेमणार लॉच्या २४ हजार उत्तरपत्रिका तपासणीसाठी
* ७० हजार घेऊन अमेरिकन डॉलर म्हणून पुण्यात एकाला दिली रद्दी
* पश्चिम रेल्वेची लोकल स्थानकाच्या कोणत्या फलाटावर कधी येणार हे समजणार एका क्लिकवर
* रायगड जिल्ह्यात स्कूलबसचे शुल्क भरले नसल्याने बसचालकाने केले दोन मुलींचे अपहरण, गुन्हा दाखल
* मराठीतील संत साहित्याचा सर्व भाषांमध्ये अनुवाद व्हायला हवा- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
* प्लॅस्टिकबरोबरच थर्माकोलवर बंदी, बाप्पांचा उत्सव होणार थर्माकोलविनाच साजरा
* भाजपचे गुणगान आणि कॉँग्रेसवर टीका करणारे दहावीचे राज्यशास्त्राचे पुस्तक बालभारतीने रद्द करावे- कॉँग्रेसची मागणी
* दहावी राज्यशास्त्राचे पुस्तक निवडणुकीत भाजपचा जाहीरनामा म्हणून वाटावे- कॉँग्रेस
* भाजपच्या राज्यात गुन्हेगारांना राजाश्रय, त्यांचे उदात्तीकरण होत आहे, यावरच त्यांचा पक्ष विस्तार- राधाकृष्ण विखे-पाटील
* युती व्हावी अशी आमचीही इच्छा, या गोष्टी घडण्याची एक वेळ असते, रात्रीतून अनेक घडामोडी घडतात, 'ती' रात्र अजून यायची आहे- चंद्रकांत पाटील
* नाणारच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिकांच्या विरोध, तीन लाख कोटीच्या प्रकल्पासाठी सौदी अरेबियातील कंपनीसोबत करार
* संसदेचे कामकाज न झाल्याने भाजपाचे उपोषण ही केवळ नाटकबाजी, अपयशी कारकिर्दीचे प्रायश्चित्त म्हणून संन्यासच घ्यावा- काँग्रेसचे रणदीप सुर्जेवाला
* पीएनबी घोटाळा: कॅनरा बँकेच्या बहरीन शाखेचे ०२ आणि बँक ऑफ इंडियाच्या बेल्जियम शाखेच्या एका अधिकाऱ्याची चौकशी
* मेहुल चोकसीला ०५ हजार २८० कोटींचे कर्ज मंजूर, सीबीआय करणार १३ बँकांची चौकशी
* निवासस्थानी असलेली सुरक्षा व्यवस्था उठविली, मला आणि माझ्या कुटुंबीयांना मारण्याचा कट - राबडी देवी
* कावेरी वादाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईतील आयपीएलचे सर्व सामने होणार पुण्यात
* राजस्थान रॉयल्स संघाने केली दिल्ली डेअर डेव्हिल्सवर १० धावांनी मात
राष्ट्रकुल स्पर्धा:
* नेमबाजी डबल ट्रॅपमध्ये अंकुर मित्तलला कांस्यपदक
* महिलांच्या डबल ट्रॅप नेमबाजीत श्रेयसा सिंहला सुवर्णपदक
* माझाही डेटा अनेक वादग्रस्त लोकांना विकण्यात आला- फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग


Comments

Top