HOME   महत्वाच्या घडामोडी

रमेश कराड यांची विधान परिषदेची उमेदवारी मागे, डिलवाली कॉंग्रेस, सलमानचा फैसला, पाच मिनिटात विदर्भात समुद्र, कृष्ण मोदी-कौरव गांधी.......०७ मे २०१८

रमेश कराड यांची विधान परिषदेची उमेदवारी मागे, डिलवाली कॉंग्रेस, सलमानचा फैसला, पाच मिनिटात विदर्भात समुद्र, कृष्ण मोदी-कौरव गांधी.......०७ मे २०१८

* रमेश कराड यांची विधानपरिषद निवडणुकीतून माघार, अर्ज घेतला मागे
* राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार अशोक जगदाळे यांना कॉंग्रेस अन राष्ट्रवादीचा पाठिंबा- धनंजय मुंडे
* पंकजा मुंडे यांच्या खेळीसमोर राष्ट्रवादी नतमस्तक झाल्याची अनेकांची प्रतिक्रिया
* ०२ हजाराच्या नोटांची छपाई बंद, ५०० च्या नोटांची छपाई मोठ्या प्रमाणावर सुरु
* मुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र अव्वल
* सोशल मिडियावर राहूल गांधी यांच्या लग्नाच्या अफवा, संबंधित महिला आमदार आदिती सिंह म्हणाली, राहूल माझ्या भावासारखे!
* पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहातील बाथरुममध्ये एम कॉमचा विद्यार्थी ऋषिकेश आहेर याचा हृदय विकाराने मृत्यू
* दुधाला भाव नसल्याने खव्याचे उत्पादन वाढले, खव्याचीही मागणी घटली, गुजरातचा खवा कमी भावात येत असल्याने परिणाम
* लातुरचा पाणी पुरवठा बिघडला, पाणी आहे पण ब्लिचिंग नसल्याने बोंब!
* उदगीरमध्ये ६० जणांना जेवणातून विषबाधा, सरकारी दवाखान्यात उपचार सुरु
* लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५८५ कुटुंबाना मिळाल्या मोफत वीज जोडण्या
* नांदेड-पनवेल रेल्वेगाडीला वाढविले दोन वातानुकुलीत डबे
* लातुरच्या अंजलीनगरात १३ वर्षीय मुलीचा विवाह रोखला
* ऊसापासून थेट इथेनॉल निर्मितीचे धोरण जाहीर करा, लातुरात जैवइंधन शेतकरी संघटनेची मागणी
* लातूर जिल्ह्यातील अनेक जलप्रकल्पातील पाणी पातळी झपाट्याने होऊ लागली कमी
* देशातील १३ राज्यात आज वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता, हरयाणातील शाळांना दोन दिवस सुटी
* गर्दी टाळण्यासाठी छगन भुजबळ आज फेसबुक लाईव्हवरुन सर्वांशी संवाद साधणार
* काळवीट शिकार प्रकरणी सलमानखानच्या शिक्षेवर आज सुनावणी
* सेना-भाजपाची युती झाली पण मतभेद कायम
* हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष टोकाला, इंदापुरच्या जागेवरुन वाद
* मृणालिनी फडणवीस सोलापूर विद्यापिठाच्या पहिल्या महिला कुलगुरु
* दिग्दर्शक, निर्माते अर्जून हिंगोरानी यांचं निधन
* बार्शीजवळ शिवशाही बसचे टायर फुटले, प्रवाशी रात्रभर रस्त्यावर
* नागपुरात ११ दिवसात ०९ हत्या
* तेल शुध्दीकरण प्रकल्पाला समुद्रकिनाऱ्याची गरज असेल तर मोदींना सांगा ते पाच मिनिटांत विदर्भात समुद्र आणतील- उध्दव ठाकरे
* तेल शुध्दीकरणाच्या प्रकल्पाला समुद्रकिनाऱ्याची गरज असते असे मुख्यमंत्र्यांचे होते वक्तव्य
* विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ अधिक तिथे सेनेचा उमेदवार, स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घ्या- उध्दव ठाकरे
* ज्या जागांवर सेनेचा उमेदवार नाही, तिथे कोणाला मदत करायची हे स्थानिकांनी ठरवावे- उध्दव ठाकरे
* ही पध्दत विधानसभा, लोकसभा निवडणुकीत नाही, सेना स्वबळावर लढण्यावर ठाम - उध्दव ठाकरे
* मुंबईकडे येणाऱ्या हावडा- मुंबई एक्स्प्रेसच्या इंजिनाला आग, घाबरून गाडीतून उडी घेतल्याने सहाय्यक लोको पायलटचा मृत्यू
* राज्यात नववी व दहावीप्रमाणेच अकरावीच्या नापास विद्यार्थ्यांनाही फेरपरीक्षेची संधी द्या- शिक्षक आमदार कपिल पाटील
* औरंगाबाद येथे भाजप जिल्हा सरचिटणीस संजय फत्तेलष्कर यांच्यावर तलवारीने हल्ला
* लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीनिमित्त कराड येथे ११ ते १३ मे दरम्यान लोककला संमेलन
* दोन हजारच्या नोटेची छपाई थांबवून ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांच्या अतिरिक्त छपाईवर भर- आर्थिक व्यवहार खाते
* रोख रकमेची चणचण भासत असल्याने पाचशे रुपयांच्या नोटांची दररोज तीन हजार कोटीपर्यंत छपाई
* अरुण दाते यांच्या अंत्यसंस्कारास अपवाद वगळता संगीत व सिनेसृष्टीतील कलाकारांची पाठ
* पुणे येथे रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यासाठी ०८ हजाराची लाच घेणारा पोलिस गजाआड
* नागपुरात जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी दरवर्षी खासदार क्रीडा महोत्सव होणार, अत्याधुनिक व्यायामशाळा होणार- नितीन गडकरी
* आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरात पावसाची शक्यता
* जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात गडगडाटासह पाऊस आणि वादळी वारे
* वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरासह प्रमुख मंदिरे बॉम्बने उडवून देणारे धमकीचं पत्र
* काँग्रेस ना दिलवाली आहे, ना दलितवाली, फक्त डीलवाली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
* येडियुरप्पांवर काँग्रेस आरोप करत आहेत, मात्र माय-लेकांवर ०५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप- नरेंद्र मोदी
* येडियुरप्पांच्या नेतृत्त्वाखाली भाजप कर्नाटकात सरकार स्थापन करणार- राजनाथ सिंह
* राजकीय धर्मयुद्ध होणार, कृष्ण असतील पंतप्रधान, कौरव असतील राहुल गांधी, मायावती आणि लालूप्रसाद- आ. सुरेंद्र सिंह
* शोपियांमध्ये दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत काश्मीर विद्यापीठातील प्राध्यापक ठार, अवघ्या ३६ तासांत दहशतवादी झाल्याचं उघडकीस


Comments

Top