HOME   महत्वाच्या घडामोडी

शिवशाही कठड्यावर, बारावीला बायोमेट्रीक, काश्मिरात पुन्हा सर्च ऑपरेशन, केजरीवाल नक्षलवादी? मोनोरेल ऑगस्टमध्ये, फुटपाथवर शौचालय.......१७ जून १८

शिवशाही कठड्यावर, बारावीला बायोमेट्रीक, काश्मिरात पुन्हा सर्च ऑपरेशन, केजरीवाल नक्षलवादी? मोनोरेल ऑगस्टमध्ये, फुटपाथवर शौचालय.......१७ जून १८

* खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना २०१८ चा संसदरत्न पुरस्कार जाहीर
* अर्थमंत्री मुनगंटीवारांनी लातुरात केलं वृक्षारोपण वृक्ष संवर्ध कार्डाचंअही वितरण
* ज्येषठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या ‘बिनचेहर्‍यांची माणसं’ या पुस्तकाचं मुनगंटीवारांनी केलं प्रकाशन
* मुरूडमध्ये शिवशाही बस पुलाच्या कठड्यावर चढली, प्रवासी सुखरूप
* रेणापुरातील निवाडा गावात दोन गटात हाणामारी १० जण जखमी
* अहमदपूर-लातूर महामार्गावरील वाहून गेलेल्या पुलाचे झाले काम, वाहतूक सुरळीत
* बारावी विज्ञानची मुलं नुसतीच प्रत्यक्षिकांना हजर असतात, वर्गात नसतात, यंदा बायोमेट्रीक उपस्थिती सक्तीची
* शिवशीही चालली होती पुण्याहून नांदेडला
* निती आयोगाची आज दिल्लीत बैठक
* आर्थिक विकासदर दोन अंकी करण्याचे आव्हान
* रमजान निमित्त पाकिस्तानसोबत सुरू केलेली शस्त्रसंधीची मुदत वाढवली जाणार नाही
* कश्मिरात पुन्हा सर्च ऑपरेशन सुरु
* भाजपा खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर केला नक्षलवादी असल्याचा आरोप
* केजरीवाल्यांच्या ठिय्या आंदोलनास चार मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा
* लातुरच्या मोरेनगरात प्लॉट नावावर करुन देत नसल्याने मुलाने केला नारळपाण्यातून विष देऊन खून
* आरक्षणाबाबत अपप्रचार संघानं केलं भाजपला सावध
* कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी परशुराम वाघमारेचा ताबा घेण्याची शक्यता
* काठमांडूमध्ये भारतीय दुतावासाने योग शिबिराचे आयोजन
* अहमदनगरच्या पाथर्डीचे माजी आमदार दगडू पाटील बडे यांचे निधन
* मुंबईत नाट्यइतिहास जपणारं, नाट्यसंस्कृतीचं दर्शन घडवणारं दालन उभारणार- उद्धव ठाकरे.
* मराठी नाट्य संमेलन: भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी नाट्य परिषदेला दिली ५ लाख रुपयांची देणगी
* मुंबईत मोनोरेल ऑगस्टमध्ये सुरु करण्याच्या हालचाली
* जम्मू आणि काश्मीर: जेष्ठ पत्रकार आणि 'रायझिंग काश्मीर'चे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्ये प्रकरणी चौथा संशयित पोलिसांच्या ताब्यात.
* परशुराम वाघमारे यानेच पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची हत्या केली, गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी या तिघांची एकाच हत्याराने हत्या
* परशुराम वाघमारे याने दिली खुनाची कबुली
* आता मुंबईत सुरु होणार फुटपाथवर सशुल्क शौचालय
* पुण्याच्या सेनापती बापट मार्गावरील एटीएम फोडले पण कॅशबॉक्स फोडता न आल्यानं हाती काहीच नाही!
* जात प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढवली, अभियांत्रिकी, फार्मसी, फाइन आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना दिलासा.
* बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीची सुटका करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
* काश्मिरात इदच्या दिवशी हिंसाचार


Comments

Top