HOME   महत्वाच्या घडामोडी

कॉंग्रेसच्या भारत बंदला प्रतिसाद, पन्नास वर्ष तरी भाजपाला कुणी हरवू शकणार नाही- अमित शाह आज कॉंग्रेसचा भारत बंद, अण्णांचं दोन ऑक्टोबरपासून उपोषण.......१० सप्टेंबर २०१८

कॉंग्रेसच्या भारत बंदला प्रतिसाद, पन्नास वर्ष तरी भाजपाला कुणी हरवू शकणार नाही- अमित शाह आज कॉंग्रेसचा भारत बंद, अण्णांचं दोन ऑक्टोबरपासून उपोषण.......१० सप्टेंबर २०१८

* लातुरातले सगळे पेट्रोल पंप बंद, भारत बंदला प्रतिसाद
* लातुरातील काही शाळा चालू, काही बंद
* पुण्यात भारत बंदला हिंसक वळण, प्रवाशांना उतरवून बस फोडली
* भारत बंदला चांगला प्रतिसाद, मोदी हटाव देश बचावच्या घोषणा
* मुंबईत मेट्रो अडवण्याचा प्रयत्न
* आज पेट्रोल २३ तर डिझेल ३२ पैशांनी वाढले
* भाजपाची तीन दिवसीय बैठक संपली, पन्नास वर्ष तरी भाजपाला कुणी हरवू शकणार नाही- अमित शाह
* आज कॉंग्रेसचा भारत बंद, अण्णांचं दोन ऑक्टोबरपासून उपोषण.......१० सप्टेंबर २०१८
* भारत बंदमध्ये सहभागी व्हा, आ. अमित देशमुख यांचे आवाहन
* कॉंग्रेसच्या भारत बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार नाही
* आम्हाला विरोधी पक्षांची ताकद पहायची आहे- शिवसेना
* अत्यावश्यक सेवात अडथळे येणार नाहीत- संजय निरुपम
* भारत बंदमध्ये मनसेही सक्रीयपणे सहभागी होणार
* शासनाकडून मनसेला नोटीस
* भारतात फक्त महाराष्ट्रात पेट्रोल अधिक भावाने विकले जाते- अजित पवार
* बुलडाण्य़ात पोळ्यातील बैलांच्या पाठीवर सरकारविरोधी घोषणा
* प्रीतम मुंडेंवर आक्षेपार्हा लिखाण करणार्‍या तरुणाला बेदम मारहाण
* सांगलीत बनावट नोटा प्रकरणी पाचजणांना अटक, प्रकरणाची पाळेमुळे पश्चिम बंगालमध्ये
* ऊसाची एफआरपी तीन हप्त्यात देण्याची तरतूद करावी- बीबी ठोंबरे यांची मागणी
* ठाणे-मुंब्रा मार्ग दुरुस्त, आजपासून वाहतुकीसाठी खुला
* पुण्यात निघाला मुस्लीम समाजाचा विराट महामोर्चा, अनेक पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा
* महागाईच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष अपयशी ठरले तर शिवसेना रस्त्यावर उतरेल
* पावसामुळे आठ दिवस शाळा बंद राहिल्याने भारत बंदमध्ये मुंबईतील शाळांचा सहभाग नाही
* भारत बंद पार्श्वभूमीवर चंद्रपुरात पेट्रोल पंपावरील नरेंद्र मोदींच्या छायाचित्रांवर शाईफेक, पुनरावृत्ती टाळण्यासाठी मोदींचे छायाचित्र टाकले काढून
* लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीसंबंधी मिळालेले उत्तर अमान्य, ०२ ऑक्टोबरपासून उपोषण सुरु- अण्णा हजारे
* सरकार विरोधात सर्व पक्ष व नेते एकत्र आले नाही तर सत्ताधाऱ्यांकडून प्रत्येकाला एकटे पाडून मारले जाईल- स्वामी अग्निवेश
* मोदी आणि शहांच्या हुकुमशाहीला बहुतांश मंत्री, खासदार कंटाळलेत, मंत्री केवळ नावालाच, कारभार मोदीच पाहतात- खासदार मजीत मेमन परभणीत
* गणेशोत्सवात जितक्या ताकदीने ढोल बडवता त्याच ताकदीने महाराष्ट्रावर संकट आणणाऱ्यांनाही बडवा- राज ठाकरे,
* सांगलीत जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक शिक्षकांमध्ये हाणामारी, खाली पाडून झाली फ्री-स्टाईल हाणामारी
* एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या, संशयित नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात
* अलिबागमध्ये काँग्रेसच्या महिलांनी भाजप कार्यालयासमोर आ. राम कदम यांच्या विरोधात केले आंदोलन
* राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडण्याची तामिळनाडू सरकार करणार राज्यपालांकडे शिफारस
* भारतीय टपाल खात्याचा आता विमा क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय
* भारत-इंग्लंड सामना पाहण्यासाठी विजय मल्ल्या ओवल स्टेडिअममध्ये


Comments

Top