HOME   महत्वाच्या घडामोडी

लातुरात अद्भूत रांगोळ्या, फटाकेबंदीची ऐशीऐशी, धनंजय मुंडेंकडं दिवाळी नाही, लातूर जिल्ह्यातील ४२ मंडळं दुष्काळी, नोटाबंदीचा दुसरा वाढदिवस.........०८ नोव्हेंबर २०१८

लातुरात अद्भूत रांगोळ्या, फटाकेबंदीची ऐशीऐशी, धनंजय मुंडेंकडं दिवाळी नाही, लातूर जिल्ह्यातील ४२ मंडळं दुष्काळी, नोटाबंदीचा दुसरा वाढदिवस.........०८ नोव्हेंबर २०१८

* लातुरच्या गणेश हॉलमध्ये कलावंतांनी रेखाटल्या अदभूत रांगोळ्या, एकदा पहायलाच हव्यात
* फटाकेबंदीची ऐशीतैशी, राज्यात ४५ ठिकाणी लागल्या आगी
* वसईत ६० ते ७० गोदामांना आग
* मोदींनी घेतले केदारनाथांचे दर्शन, प्रलयानंतर झालेल्या कामांची पाहणी
* ठरलेल्या वेळेत फटाके न वाजवल्याने मुंबईत आठजणांवर कारवाई
* पेट्रोल २० तर डिझेल १९ पैशांनी स्वस्त
* अवनी-टीवन वाघिणीचे बछडेही नरभक्षक
* दुष्काळामुळे दिवाळीचा सण साजरा न करण्याचा धनंजय मुंडे यांचा निर्णय
* दुष्काळग्रस्त तालुक्यात मराठवाड्यातील ६८ मंडळांचा समावेश, लातूर जिल्ह्यातील ४२ मंडळांचा समावेश
* जिल्ह्यातील समाविष्ट मंडळे:
* लातूर तालुका- लातूर, बाभळगाव, हरंगुळ, मुरूड, गातेगाव, तांदूळजा, चिंचोली
* औसा तालुका- लामजना, औसा, मातोळा, भादा, बेलकुंड, किन्नीथोट, किल्लारी
* अहमदपूर तालुका - खंडाळी, अहमदपूर, आंदोरी, शिरूर, हाडोळती
* निलंगा तालुका- पानचिंचोली, औराद, अंबुलगा, मदनसुरी, कासारशिरसी
* उदगीर तालुका- उदगीर, नागलगाव, नळगीर, मोघा, हेर, देवर्जन
* चाकूर तालुका- चाकूर, नळेगाव, वडवळ, शेळगाव, झरी
* रेणापूर तालुका- पोहरेगाव, कारेपूर
* देवणी तालुका- देवणी, बोरोळ, वलांडी
* जळकोट तालुका- जळकोट आणि घोणसी
* औरंगाबादमध्ये फटाक्यामुळे आरटीओ कार्यालयातील कोळश्याच्या ट्रकला आग
* मुंबईत आज पासून रंगणार 'पु.ल.महोत्सव'
* रक्तपात दिसल्याशिवाय निर्णय घायचाच नाही अशी मंडळी सरकारमध्ये, याआधीच्या सरकारचा असा अनुभव आला नव्हता- खासदार राजू शेट्टी
* सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हय़ांत ११ नोव्हेंबर रोजी चक्का जाम- खासदार राजू शेट्टी
* वनमंत्री आहेत म्हणून सुधीर मुनगंटीवारांना सर्व कळते असे नाही, त्यांनी जंगलाचे संशोधन केलेले नाही, उद्या त्यांचे मंत्रिपद जाऊ शकते- राज ठाकरे
* तृतीयपंथीय शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावेत म्हणून कोल्हापुरच्या मुक्त विद्यापीठात मोफत उच्च शिक्षण
* कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विज्ञान मंडळातर्फे ऊस पीक स्पर्धा, ऊसाचे एकरी १०० टनापेक्षा जास्त ऊत्पादन घेणाऱ्यांना विमान प्रवासाची संधी
* आज नोटाबंदीचा दुसरा वाढदिवस, काळ्या पैशात मोठ्या प्रमाणावर वाढ, चलनी नोटांचे प्रमाणही वाढले- 'लोकल सर्कल'चा सर्व्हे
* रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नर अर्थमंत्र्यांपेक्षा मोठा नसतो, अर्थमंत्र्यांच्या निर्णयाबाबत गव्हर्नर नकार देऊ शकत नाही- मनमोहन सिंग
* तामिळनाडू विधानसभा पोटनिवडणुकीच्या सर्व २० जागा लढणार- कमल हसन
* हैदराबादमध्ये ०७ कोटीच्या रोकडसह चौघांना अटक
* पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजनेंतर्गत आतापर्यंत ८५ लाख तरुणांना रोजगारसंधी
* महिला टी-२० वर्ल्डकप ०९ नोव्हेंबरपासून सुरु


Comments

Top