HOME   महत्वाच्या घडामोडी

आंदोलन कसले करता? एक तारखेला आरक्षणाचा जल्लोष करा, मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाला आवाहन.........१६ नोव्हेंबर २०१८

तृप्ती देसाई केरळात, ‘नाळ’ होणार आज प्रदर्शित, प्रचारासाठी पंतप्रधान मध्यप्रदेशात, गुळाचा चहा, वनीचे बछडे सापडेनात, शिवस्मारक उभारा पद्मदुर्गवर....

आंदोलन कसले करता? एक तारखेला आरक्षणाचा जल्लोष करा, मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाला आवाहन.........१६ नोव्हेंबर २०१८

* शबरीमाला मंदिरात जाण्यासाठी तृपी देसाई केरळ विमानळावर
* केरळ विमानतळावर मोठा बंदोबस्त
* नागराज मंजुळेचा ‘नाळ’ सिनेमा आज होणार प्रदर्शित
* पेट्रोल १८ तर डिझेल १७ पैशांनी स्वस्त
* पंतप्रधानांच्या हत्येचा कट केल्याप्रकरणी एल्गारच्या पाच कार्यकर्त्यावर आरोपपत्र
* मध्यप्रदेशात आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात
* २० हजार पानांचा मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारला सुपूर्त
* मराठा आरक्षणावर १८ नोव्हेंबरच्या कॅबिनेटमध्ये निर्णय
* मराठा समाजाने आंदोलन न करता एक तारखेला जल्लोष करा मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाला आवाहन
* मराठ्यांना १६ टक्के आरक्षण द्या- रावसाहेब दानवे
* मुस्लीम समाजालाही पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी
* नागापट्टणमला चक्रीवादळाची धडक, तामिळनाडूत
* औरंगाबादेत गुळाच्या चहाला मोठा प्रतिसाद
* मराठा आरक्षणाचा अहवाल गुप्त न राहिल्यानं कोल्हापूर ते मुंबई मोर्चा काढणार
* आरक्षणासाठी धनगर समाज गुजर समाजापेक्षा तीव्र आंदोलन करणार
* अवनी वाघीणीच्या दोन बछड्यांची उपासमार होऊ नये म्हणून हरप्रकारे शोध घेणे सुरु
* मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी मुनगंटीवारांना धारेवर धरले
* ज्यांना राम आठवला ते अडचणीत सापडले आहेत- राजू शेट्टी
* चंद्रपूरमध्ये बल्लारपूर एक्सप्रेसने दिलेल्या धडकेत वाघांच्या तीन बछड्यांचा मृत्यू
* न्यायालयाच्या निर्देशानुसारच अवनीचे 'एन्काऊंटर' केले, माझ्या राजीनाम्याविषयी मनेका नव्हे, शहा ठरवतील- मुनगंटीवार
* दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चौघांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित- सीबीआयची कोर्टात माहिती
* कोरेगाव-भीमा प्रकरण- एल्गार परिषद आणि प्रचारामुळे दंगल झाल्याचे आरोपत्रात नमूद
* गोविंद पानसरे हत्या प्रकरण- संशयित अमोल काळेला २२ नोव्‍हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
* डीएसकेंच्या महागड्या वाहनांची विक्री करुन रकमेचे ठेवीदारांना वाटप करण्याचा आराखडा तयार करा- कोर्टाचे पोलिसांना आदेश
* अशोक चव्हाण यांनी लोकसभेची नाही तर विधानसभेची निवडणूक लढवावी- कार्यकर्त्यांचा आग्रह
* लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्वाभिमानीचे प्रसिद्धीसाठी आंदोलन सुरू- सदाभाऊ खोत
* राज्यात डॉक्टर, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १५ हजार २९४ पदे रिक्त
* आदिवासी योजनांच्या अंमलबजावणीसाठी वनवासी कल्याण आश्रमाचा मुंबईत मोर्चा
* अरबी समुद्रातील शिवस्मारक रायगड जिल्ह्यातील पद्मदुर्ग किल्ल्यावर उभारा- महाराष्ट्र कोळी समाज संघ
* पुणे येथे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे रविवारपासून 'पु.ल' चित्रपट महोत्सव
* औरंगाबादमध्ये १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करणार्‍या दत्ता चिंचोलेचा जामीन अर्ज फेटाळला
* औरंगाबादेत तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक रामेश्वर भादवे व विजय लोखंडेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला
* नाशिकचे सायकलीस्ट डॉ. महेंद्र महाजन यांचा विश्वविक्रम, काश्मीर ते कन्याकुमारी ०३ हजार ८५० किमीचे अंतर १० दिवस १० तासात केले पूर्ण
* 'बोन्साय' वृक्ष कलेसाठी पस्तीस वर्षे कार्यरत असणाऱ्या पुण्याच्या प्राजक्ता काळे यांचा बोन्साय वृक्ष लागवडीचा जागतिक विक्रम
* जेष्ठ कवियत्री आणि समीक्षक प्रभा गणोरकर यांना शिरीष पै पुरस्कार प्रदान
* नोटाबंदीनंतर विवरणपत्र दाखल न करणाऱ्या ८० हजार जणांना प्राप्तिकर विभागाची नोटीस
* अय्यप्पा मंदिर सर्वच महिलांना खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे राज्य सरकारचे कर्तव्य- केरळचे मुख्यमंत्री पिनरई
* नरेंद्र मोदी यांनी राफेल विमान खरेदीचे मूल्य २२ हजार ७४३ कोटींनी वाढवून ६२ हजार १६६ कोटी केले- काँग्रेस
* तेलंगणा विधानसभा निवडणूक: भाजपच्या २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर
* राष्ट्रपती रामनाथ कोविंद १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान व्हिएतनामच्या दौऱ्यावर
* पंजाबमध्ये जैश-ए-मोहम्मदचे चार अतिरेकी घुसले, इनोव्हा कार पळवल्याने खळबळ, हाय अॅलर्ट
* भारताच्या पंकज अडवाणीला सलग तिसऱ्यांदा जागतिक बिलियर्ड्स स्पर्धेचे जेतेपद
* महिला टी-२० वर्ल्डकप- भारत उपांत्य फेरीत


Comments

Top