HOME   महत्वाच्या घडामोडी

मराठा आरक्षण पुन्हा अडचणीत?, ठाकरे-फडणवीसांच्या दोन बैठका, हेल्मेटची सक्ती, अवनीच्या बछड्यांनी केली घोड्याची शिकार.....२० नोव्हेंबर २०१८

मराठा आरक्षण पुन्हा अडचणीत?, ठाकरे-फडणवीसांच्या दोन बैठका, हेल्मेटची सक्ती, अवनीच्या बछड्यांनी केली घोड्याची शिकार.....२० नोव्हेंबर २०१८

* मराठा आरक्षणासाठी एसईबीसी कोटा देण्यास मराठा नेत्यांचा आक्षेप
* एसईबीसी पद्धतीला ओबीसी नेत्यांचाही विरोध
* मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची दोनदा बंद दाराआड चर्चा
* मराठा समाजाला जल्लोषाची तारीख दिली, आम्हालाही द्या, एमआयएमची मागणी
* देशातील रुग्णालयात मुंबईचे केईएम रुग्णालय सर्वप्रथम
* अवनी वाघिणीच्या बछड्यांनी केली घोड्याची शिकार
* रावसाहेब दानवे यांनी केली घोडेस्वारी
* नाशिकातील चारा इतर जिल्ह्यांना देऊ नका- राज्य सरकारचा आदेश
* मोबाईलवर बोलत गाडी चालवताना सापडल्यास तीन महिने परवाना होणार निलंबित
* आज विधीमंडळ अधिवेशनापूर्वी विरोधकांची बैठक
* ओला उबेर टॅक्सीचालकांनी संप घेतला माघारी
* मराठा आरक्षण अहवाल राज्य सरकारनं न्यायालयासमोर सादर करावा- उच्च न्यायालयात याचिका, बुधवारी सुनावणी
* शेतमाल नियमन मुक्तीच्या विरोधात राज्यातील सर्व बाजार समित्या जाणार हायकोर्टात
* राज्यातील सर्व लोकसभा, विधानसभा निवडणुका लढण्याचा महाराष्ट्र क्रांती सेनेचा निर्णय
* सोलापुरच्या महापौर, त्यांचे पती, भाजप शहराध्यक्ष आणि इतरांनी विषप्रयोग केला- भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील
* मालेगाव बॉम्बस्फोट- कर्नल पुरोहितच्या याचिकेवर सुनावणी, ट्रायलला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार
* अमरावती जिल्ह्यात पाठलाग करणार्‍या तहसीलदारांच्या गाडीला रेती माफीयाने दिली धडक, ४० फ़ूट नेले फरफटवत
* नागपुरात बनावट दस्तऐवजाद्वारे पीककर्ज, आयडीबीआय बँकेला पावणे दोन कोटींचा गंडा, १२ जणांना अटक
* शाहरूख खानच्या 'झिरो' चित्रपटाबाबत ३० नोव्हेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी
* पुणे येथे आजपासून शासकीय कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीची
* उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात आरतीसह कार्यक्रमांना परवानग्या मिळवण्यासाठी सेनेच्या उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी
* तात्या टोपे यांच्या द्विशताब्दी जयंती दिनानिमित्त, नाशिक जिल्ह्यात येवला येथे होणार स्मारक
* बँक खात्याशी आधार क्रमांक जोडला नाही म्हणून वेतन रोखू नका- उच्च न्यायालयाचे जहाज बांधणी मंत्रालयाला आदेश
* डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची स्थुलता नियंत्रण मोहिमेसाठी ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्ती
* माओवाद्यांबरोबर संबंध, आरोप सिद्ध करा, दिग्विजयसिंहांचे आव्हान
* जिग्नेश मेवानी आणि कन्हैया कुमार यांच्यावर ग्वाल्हेर येथे एका कार्यक्रमादरम्यान शाईफेक
* राजस्थान विधानसभा निवडणूक- काँग्रेसचे अशोक गहलोत यांचा उमेदवारी अर्ज
* चलनटंचाई कमी करण्यासाठी सरकारी रोखे खरेदी करण्यास रिझर्व्ह बँक तयार
* काही लोक काम करतात, पण श्रेय घेत नाहीत, तर काही केवळ श्रेय घेण्याचं काम करतात- सोनिया * गांधी
* नरेंद्र मोदी देशातील प्रत्येक संस्था उद्ध्वस्त करत आहेत- राहुल गांधी
सीबीआयच्या वादात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचा हस्तक्षेप- सीबीआयचे मनीष कुमार
भाजप सरकारविरोधात तयार होणाऱ्या महाआघाडीचा चेहरा प्रत्येकजण- ममता बॅनर्जी
पीएनबी घोटाळा- नीरव मोदीची चौकशी रोखण्यासाठीच सीबीआय अधिकाऱ्यांची बदली- सीबीआयचे डीआयजी
शबरीमला मंदिर परिसरात जमावबंदीचं पालन न करणाऱ्या भाविकांना अटक केल्याने संपूर्ण केरळमध्ये आंदोलन
काँग्रेसच्या अटकवण्याच्या, लटकवण्याच्या आणि भटकवण्याच्या संस्कृतीमुळे देशाचं भरपूर नुकसान- नरेंद्र मोदी
हरयाणा दिल्ली एक्सप्रेस वेचे पंतप्रधानांनी केलं उद्घाटन


Comments

Top