HOME   महत्वाच्या घडामोडी

उद्या मुंबईत शेतकर्‍यांचा मोर्चा, बच्चन यांना सयाजीराव रत्न पुरस्कार, मेथी रस्त्यावर, ओबीसी ३० टक्क्यांवर गेले कसे? आज जागतिक टीव्ही दिन, तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली.......२१ नोव्हेंबर २०१८

Updated

उद्या मुंबईत शेतकर्‍यांचा मोर्चा, बच्चन यांना सयाजीराव रत्न पुरस्कार, मेथी रस्त्यावर, ओबीसी ३० टक्क्यांवर गेले कसे? आज जागतिक टीव्ही दिन, तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली.......२१ नोव्हेंबर २०१८

* शेतकर्‍यांचा विराट मोर्चा मुंबईत, उद्या पोचणार आझाद मैदानावर
* कर्जमाफी, दुष्काळ निवारण आणि आदिवासींच्या मागण्यासांठी शेतकर्‍यांचा मोर्चा
* शेतकर्‍यांच्या कर्जमाफीत मोठे योगदान दिल्याबद्दल अमिताभ बच्चन यांना बडोद्यात ‘सयाजीराव रत्न’ पुरस्कार प्रदान
* ‘सयाजीराव रत्न’ हा पुरस्कार याआधी मिळाला होता रतन टाटा यांना
* पुण्याच्या आनंदनगर पार्कमधील घरात पतीने केली पत्नीची गोळ्या घालून हत्या
* जालन्यात मेथीला भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी रस्त्यावर फेकून दिल्या मेथीच्या जुड्या
* औरंगाबादेत १४ लाखांचा गुटखा पकडला
* मराठा आरक्षण प्रकरणी विनोद पाटील यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने काढली निकाली
* ओबीसींचं आरक्षण १४ टक्क्यांवरुन ३० टक्क्यांवर कसं गेलं? मराठा मंथन परिषदेचा प्रश्न
* आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी
* अभिनेता आलोकनाथ यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार
* आज जागतिक टीव्ही दिन
* नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नेमणूक
* शिवनेरीच्या मातीचा कलश घेऊन उध्दव ठाकरे होणार अयोध्येला रवाना, २४ तारखेला शरयू नदीची महाआरती
* अयोध्येतील संत महंतांनी शिवसेनेचे निमंत्रण नाकारलं
* मांजरा धरणातून लातूरच्या उद्योगांसाठी जानेवारीपर्यंत पाणी राहणार सुरु-विभागीय आयुक्त
* धनगर आरक्षणाचा मुद्दा तापू लागला, टीसचा अहवाल आला
* टीसचा अहवाल धनगर आरक्षण समाजाला नाराज करणारा
* मुस्लीम आरक्षणावरुन विधानसभेत मुस्लीम आमदारांचा गोंधळ, राजदंड पळवण्याचा प्रयत्न
* अनिल गोटे यांनी केली नव्या पक्षाची घोषणा, पक्षाचे निवडणूक चिन्ह शिट्टी
* साई संस्थानावर त्रयस्थ समिती नेमण्याचा सुप्रीम कोर्टाचे आदेश
* दिल्लीत मंत्रालयाबाहेर येताना अज्ञात व्यक्तीने फेकली मिरची पूड
* आगामी निवडणूक लढवणार नाही, सुषमा स्वराज यांची घोषणा
* दीपिका पदुकोन आणि रणवीर यांच्या विवाहानिमित्त आज दिल्लीत रिसेप्शन
* दिल्लीत दोन दहशवादी घुसल्याची माहिती, त्यांची रेखाचित्रे जारी
* येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात सहाजण ठार
* जीएसटीच्या अधिकार्‍याला दहा लाखांची लाच घेताना अटक
* राज्यातील सर्व शाळात मराठी भाषा सक्तीची करणार- विनोद तावडे
* आज भायखळात ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीचे नेतृत्व करणार शरद पवार
* मराठा आरक्षणाला विरोध नाही, 'ओबीसी' गटात त्यांचा समावेश करू नये- राष्ट्रीय सत्यशोधक महामंडळ
* घटनात्मक पेच निर्माण होणार असेल तर मराठा आरक्षण अहवाल पटलावर ठेवू नका- अजित पवार
* मराठा आरक्षणाला २८८ आमदारांचा पाठिंबा, आरक्षण घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत द्यावे - अजित पवार
* वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे प्राण्यांची संख्या वाढल्याने उपद्रव वाढला, कायदा रद्द करा- शेतकरी संघटना
* बेगडी प्राणीप्रेम दाखवणाऱ्या ‘पेटा’सारख्या संस्थांवर बंदी घालण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी मोर्चा- शेतकरी संघटना
* मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी काँग्रेसचे षडयंत्र- विनोद तावडे
* निवडणुकांप्रसंगीच मंदिराचा मुद्दा का घेता, निवडणुकीच्या तोंडावर पहिलं रामराम, मग आराम- उद्धव ठाकरे
* राष्ट्रवादीचे गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील मंदिरावर हातोडा
* सोशल मीडियावर कॉलेजचे नाव वापरण्यास मुंबईतील सरकारी विधी कॉलेजची बंदी
* मुंबईमधील ७८ टक्के दुधाचा दर्जा निकृष्ट असल्याचं उघड
* शिवसेनेने २५ नोव्हेंबरला आयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाचे स्थळ बदलले
* मुंबईतून २०१३ पासून २६ हजारहून अधिक मुली आणि महिला बेपत्ता- मुख्यमंत्री
* दक्षिण अफ्रिका खंडातील हापूस आंबा पुण्यात दाखल
* 'राम जन्मभूमी' चित्रपटाच्या ट्रेलरविरोधात रझा संस्थेची तक्रार
* छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी झाले ७१.९३ टक्के मतदान
* १९८४ मधील शीखविरोधी दंगलीतील हत्येप्रकरणी एकाला फाशी तर दुसर्‍याला जन्मठेप
* सीबीआयच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करावी अशी तुमची लायकीच नाही- सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
* सीबीआय प्रमुख आलोक वर्मांची दक्षता आयोगासमोरची साक्ष कोर्टाची परवानगी न घेता झाली प्रकाशित
* राजस्थानात भाजपा आमदार राजा भैया यांच्या वडिलांकडे साडे अकरा लाख सापडल्या प्रकरणी अटक
* मध्य प्रदेशात भाजप उमेदवार आमदार दिलीप शेखावतना घातला चप्पलचा हार
* आई-वडिलांचा घटस्फोट असेल तर पॅनकार्डवर वडिलांचं नाव टाकण्याचं बंधन नाही
* मेरी कोम जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत दाखल


Comments

Top