HOME   महत्वाच्या घडामोडी

आजपासून गोवर-रुबेला लसीकरण, पाच तारखेला मराठा आरक्षण, नासाचे यान उतरले मंगळवार, छम्मा छम्माचा रिमेक, काळ्या पैशाचं काय झालं?......२७ नोव्हेंबर २०१८

आजपासून गोवर-रुबेला लसीकरण, पाच तारखेला मराठा आरक्षण, नासाचे यान उतरले मंगळवार, छम्मा छम्माचा रिमेक, काळ्या पैशाचं काय झालं?......२७ नोव्हेंबर २०१८

* मराठा आरक्षण पाच तारखेला लागू होण्याची शक्यता
* नासाने पाठवलेले ‘इनसाईट’ यान मंगळवार सुरक्षितरित्या उतरले
* मुख्यमंत्री आज घेणार ओबीसी नेत्यांची बैठक
* धनगर आरक्षणासाठी २३ आमदारांची उद्या बैठक
* २८ नोव्हेंबरला आदिवासी आमदारांची बैठक
* राम मंदिराचा मुद्दा दंगल घडवण्यासाठी उचलून धरला- प्रकाश आंबेडकर
* नियमन मुक्तीसाठी आज मुंबईतल्या पाचही बाजार समित्या राहणार बंद
* पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ देऊ नका सरकारचे आदेश, दहावीच्या दप्तराचे ओझे
* घटनेत टिकणारे आरक्षण द्या, मराठा क्रांती सेनेचे मागणी
* पंतप्रधानांचे बोलणे पदाप्रमाणे असावे- मनमोहनसिंग
* निवडणूक आयुक्त सुनील अरोरा होणार मुख्य निवडणूक आयुक्त, ०२ डिसेंबरला स्वीकारणार पदभार
* परभणी दौर्‍यात दानवेंचे हेलिकॉप्टर भटकले, हेलिपॅडच्या ऐवजी उतरले पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात
* छम्मा छम्मा गाण्याची येतेय रिमेक
* गोवर रुबेला लसीकरण आजपासून सुरु होणार
* १६०० रुपयांना मिळणारी लस विद्यार्थ्यांना मोळणार मोफत
* मराठा आरक्षण विधेयक २९ नोव्हेंबरला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडणार- देवेंद्र फडणवीस
* मुस्लीम समाजाला धर्माच्या आधारे आरक्षण देणं घटनाबाह्य, त्यातील मागास जातींचा ओबीसीमध्ये समावेश- महसुलमंत्री चंद्रकांत पाटील
* दर सोमवारी राज्यातील सर्व शासकीय अणि निमशासकीय कार्यालयांत दुपारी ०३ ते ०५ वेळ माहिती अधिकारासाठी राखून
* काळ्या पैशाबाबत सरकारच ‘नकारघंटा’ वाजवते तेव्हा काळ्या पैशाचे गूढ आणखीच वाढते- समानाचा अग्रलेख
* काळ्या पैशाचा तपशील उघड केला तर तपास प्रक्रियेवर प्रभाव पडू शकतो भाजपाचा दावा
* काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन निवडणुकीत दिलेले आश्वासन खोटे मानायचे का?- शिवसेना
* काळा पैसा भारतात आणून प्रत्येक देशवासीयाच्या बँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे भाजपचे होते आश्वासन
* मुंबईतील वडाळा भागात ऑईलने भरलेला टँकर उलटलून भीषण आग, एकाचा होरपळून मृत्यू
* वरवरा राव भूमिगत माओवाद्यांच्या संपर्कात असल्याचे प्राथमिक तपासात निष्षन
* माओवाद्यांशी संबध असलेल्यांवर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना ९० दिवसांची मुदतवाढ
* कलबुर्गींच्या हत्येची उकल अद्याप का नाही? तपासाच्या स्थितीचा ०२ आठवड्यांत अहवाल द्या, तपासाला किती काळ लागणार?- सर्वोच्च न्यायालय
* हरिश्चंद्रगड येथे १००० फुटावर अडकलेल्या सर्व ट्रेकर्सची सुटका
* आयडिया आणि वोडाफोन कंपन्यांचे तोट्यातून बाहेर येण्यासाठी फ्री इनकमिंग बंद
* पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुक प्रचार धर्म, जाती, गोत्राभोवतीच, राहुल गांधींनी गोत्र सांगितले पुष्कर मंदिरात
* २६/११ च्या हल्ल्यात प्राण गमावलेले १६६ जण आजही न्यायाच्या प्रतिक्षेत, हल्ल्याचा कट रचणारे पाकमध्ये मोकाट फिरत आहेत- भारताचे निवेदन
* मुंबईत २६/११ हल्ल्यावेळी सत्तेत असणारी काँग्रेस पाकवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकबद्दल सरकारला प्रश्न विचारत आहे- पंतप्रधान
* नरेंद्र मोदींनी बिगर भाजपा शासित राज्यांच्या दौऱ्यादरम्यान संयम बाळगावा, त्यांची वर्तणूक पदाला शोभणारी हवी- मनमोहनसिंग
* माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारींच्या ‘फेबल्स ऑफ फ्रॅक्चर्ड टाइम्स’पुस्तकाचे प्रकाशन केले मनमोहन सिंग यांनी
* जम्मू-काश्मीरमध्ये वर्षभरात २२६ अतिरेक्यांना कंठस्नान
* जम्मू-काश्मीरमधील अतिरेक्यांचा तळ उद्ध्वस्त, शस्त्रे आणि स्फोटकेही हस्तगत
* कोलकाता विमानतळावर विमानात दहशतवादी घुसल्याची अफ़वा पसरवणारा तरुण गजाआड


Comments

Top