HOME   महत्वाच्या घडामोडी

पवार-गांधी चर्चा, कॉंग्रेस अन राष्ट्रवादीच्या दोन स्वतंत्र यात्रा, नव्या ग्रहाचा शोध, मातोश्रीचे पगारी नोकर, घोषणांचा पाऊस थांबवा.......१० जानेवारी २०१९

पवार-गांधी चर्चा, कॉंग्रेस अन राष्ट्रवादीच्या दोन स्वतंत्र यात्रा, नव्या ग्रहाचा शोध, मातोश्रीचे पगारी नोकर, घोषणांचा पाऊस थांबवा.......१० जानेवारी २०१९

* सोलापुरात नरेंद्र मोदींना दाखवले काळे झेंडे, काँग्रेस कार्यकर्त्यांना तुडवले पोलिसांनी
* आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर
* विधेयक राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी जाणार
* गरीब सवर्णांना आरक्षण ही काँग्रेसला चपराक- नरेंद्र मोदी
* आरक्षण मिळेल पण नोकर्‍या कुठे आहेत? उद्धव ठाकरे यांचा सवाल
* मराठा आरक्षण विधेयक कोर्टात टिकणे अशक्य- न्या. पीबी सावंत
* आज केंद्राच्या जीएसटी परिषदेची बैठक, निर्माणाधीन घरांवरील कर कमी होण्याची शक्यता
* मेस्माअंतर्गत तिनशे बेस्ट कर्मचार्‍यांना नोटिसा
* बेस्ट कर्मचार्‍यांच्या संपाबाबत उद्धव ठाकरे मध्यस्थी करण्याची शक्यता
* आजपासून कॉंग्रेस काढणार जनसंघर्ष यात्रा, तर राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा
* राम जन्मभूमी वाद सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
* अयोध्या प्रकरणी पाच न्यायमुर्तींच्या न्याय खंडपिठासमोर अयोध्या प्रकरणी होणार नियमित सुनावणी
* साहित्य संमेलनाचा उदघाटक आज ठरणार
* नासानं शोधला नवा ग्रह, पृथ्वीपेक्षा तिप्पट मोठा
* रामदास कदम ‘मातोश्री’चे पगारी नोकर, उद्धव ठाकरे मतांच्या लाचारीसाठी मराठवाडा दौऱ्यावर- निलेश राणे
* राज्यातील जागावाटपाबाबत शरद पवार, राहुल गांधी यांच्यात चर्चा, जास्त जागा देण्याचा राष्ट्रवादीचा आग्रह
* राज्यातील मालमत्ता व अन्य करांची मोठय़ा प्रमाणावर वसुली करण्यासाठी आयुक्त व मुख्याधिकाऱ्यांना ठरवून देण्यात आले लक्ष्य
* स्वच्छ सर्वेक्षण, घनकचरा व्यवस्थापन योजना प्रभावीपणे राबविण्याचे आदेश, अंमलबाजवणीची नोंद होणार आयुक्त व मुख्यधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात
* उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवणार, शेतीमध्ये क्रांती घडणार- गिरीश महाजन
* सरकारने घोषणांचा पाऊस बंद करावा, केलेल्या घोषणांची नीट अंमलबजावणी करा- उद्धव ठाकरे
* प्रधानमंत्री पिकविमा योजनेतील घोटाळा राफेलपेक्षा मोठा, प्रधानमंत्री फसल योजना नसून ही शेतकऱ्यांना फसवणारी योजना- उद्धव ठाकरे
* नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत रोहित रेंगेचा संबंध नसल्याचे पत्र सीबीआयने सादर केले खंडपीठात
* रेंगेला मिळाला ५० हजारांच्या जातमुचलक्यावर आणि महिन्याच्या पहिल्या सोमवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन
* पुणे जिल्हा नियोजन बैठकीत 'पालकमंत्र्यांनी कठोर राहिले पाहिजे,' अजित पवार, 'दादा तुमचा आदर्श घेतो आणि कठोर होतो- गिरीश महाजन
* अस्वच्छ वातावरण, मुदतबाह्य पदार्थ वापरल्याप्रकरणी हिंजवडी, लवासा आणि लोणावळातील ०५ हॉटेल्सचे परवाने काही काळासाठी रद्द
* साखरेला जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतून वगळा, उद्योगांना आणि सामान्य ग्राहकांना साखर वेगवेगळ्या दरांत विकायला हवी- पंकजा मुंडे
* पुणे येथे आजपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, गोविंद निहलानी, दिलीप प्रभावळकर आणि राम-लक्ष्मण यांचा होणार सन्मान
* ज्येष्ठ नागरिक, महिला, बालकांसाठी सुरू केलेल्या 'भरोसा सेल'चे देवेंद्र फडणवीस यांनी केले उद्घाटन
* पुण्यात बेदरकार बस चालवून ०९ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला एसटी चालक संतोष मानेची फाशीची शिक्षा झाली जन्मठेप
* पुण्यात पारा घसरला ०८ अंश सेल्सिअस, दोन दिवस राहणार थंडी
* ’द अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर’ सिनेमाच्या ट्रेलरवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली दिल्ली हायकोर्टानं
* सिक्किममध्ये बर्फवृष्टीत अडकलेल्या १५० पर्यटकांची लष्कराने केली सुटका
* मायावती भाजपच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झाल्या, त्यामुळं भाजपवर दलितविरोधी असल्याचा आरोप करू नका - रामदास आठवले
* पेट्रोलपंपांवरील रांगा कमी करण्यासाठी आणि वाहनधारकांचा वेळ वाचविण्यासाठी वापर होणार 'फास्टॅग'चा, पैसे देण्यासाठी थांबावे लागणार नाही
* टाटा इंटरनॅशनलचे सर्वेसर्वा नोएल टाटा यांची टाटा समुहाच्या प्रमुखपदी निवड होण्याची शक्यता
* समुद्रात होणारी तेलगळती रोखण्याच्या कामगिरीचे नेतृत्व भारताकडे


Comments

Top